Join us  

'तो' प्रियकर आहे की भूत? गायब होतो, कॉल आणि मेसेजला रिप्लाय करत नाही? मुद्दाम करतो की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 12:49 PM

Ghosting : What it means and how to Response घोस्टिंग नावाचा एक प्रकार नात्यात दिसतो, तो फार त्रासदायक; असेच तुमच्या नात्यात तर होत नाही?

सध्या सर्वत्र गुलाबी वातावरण आहे. व्हॅलेण्टाइन्स डे स्पेशल बनवण्यासाठी प्रेमी युगुल विविध गोष्टी करताना दिसून येतील. हा दिवस वर्षातून एकदा येतो. त्यामुळे कपल हा खास दिवस उत्साहाने साजरा करतात. मात्र, एकच दिवस आपल्या प्रेमाला स्पेशल फील देऊ नका. दररोज आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. नात्यात भांड्याला भांड लागतं, वाद - विवाद हे होतातच. पण ते सोडवून जे नात्यात पुढे जातात त्याच नात्यात खरी गोडी.

पण सध्याच्या नात्यात एक शब्द प्रचंड चर्चेत आहे. तो शब्द म्हणजे घोस्टिंग. आता तुम्ही म्हणाल हा कोणता भुताचा प्रकार आहे का? तर तसे नाही, घोस्टिंग म्हणजे नात्यात जोडीदाराला न सांगता, कोणतेही संबंध न ठेवता मुव्ह ऑन होणे. अशा स्थितीत समोरच्या व्यक्तीच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. पार्टनरला नक्की झालं काय? त्याने अचानक बोलणं बंद का केलं? नात्यात अनेक वचने देऊन जेव्हा व्यक्ती आयुष्यातून निघतो, तेव्हा समोरचा पार्टनर मानसिकरित्या खचतो. याच परिस्थितीला घोस्टिंग असे म्हणतात.

ब्रेकअपपेक्षा घोस्टिंग धोकादायक

घोस्टिंग हा शब्द १९९० साली वापरण्यात आला होता. मात्र, ऑनलाईन डेटिंगच्या काळात तो अधिक लोकप्रिय झाला. ब्रेकअप ही गोष्ट प्रत्येक नात्यात असणाऱ्या व्यक्तीला माहित असेल. ब्रेकअपमध्ये व्यक्ती तुम्हाला सांगून नातं तोडते. परंतु, घोस्टिंगमध्ये व्यक्ती दिवसाआधी चांगलं बोलतो. मात्र, त्यानंतर बोलणे पूर्णपणे टाळतो. पार्टनरला इग्नोर करायला सुरुवात करतो. जोडीदाराला आयुष्यातून काढून स्वतः मुव्ह ऑन होतो. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला यासंदर्भात काहीच कल्पना नसते. कोणताही विचार न करता पार्टनरने सोडल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. यामुळे मानसिकदृष्ट्या ते खचतात.

घोस्टिंग कसं ओळखाल

अचानक मेसेजचा रिप्लाय देणे बंद करणे

कॉल वारंवार कट करणे

नंबर ब्लॉक करणे

दिसल्यानंतरही ओळख न दाखवणे

ऑफिशियल घोस्टिंग म्हणजे काय?

घोस्टिंगमध्ये देखील प्रकार आहेत. त्यातील एक प्रकार म्हणजे ऑफिशियल घोस्टिंग. यात कर्मचारी न कळवता ऑफिस कार्यालयात परतत नाही. यासह कार्यालयातून आलेल्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देत नाहीत. कामातील मित्रांना किंवा इतर लोकांना आपण जॉब सोडला आहे, या विषयी माहिती देत नाही.

सॉफ्ट घोस्टिंग म्हणजे काय?

काही लोकं घोस्टिंग करण्याआधी सॉफ्ट घोस्टिंग करतात. या स्थितीत समोरचा पार्टनर सगळं काही अचानक संपवत नाही हळूहळू नात्यातून बाहेर येतो. कॉल, मेसेज त्यानंतर भेटणे टाळतो. या परिस्थितीला सॉफ्ट घोस्टिंग म्हणतात. आपण देखील या गोष्टीला सामोरे जात असाल तर, वेळीच सावध व्हा.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप