Lokmat Sakhi >Relationship > जोडीदाराने विश्वासघात केला तर? नातं तोडायचं की दुसरी संधी द्यायची-कसं ठरवाल?

जोडीदाराने विश्वासघात केला तर? नातं तोडायचं की दुसरी संधी द्यायची-कसं ठरवाल?

Is it alright to give a second chance to your cheating partner? जोडीदाराने आपल्याला फसवलं, धोका दिला तर त्याच नात्याला दुसरी संधी द्यायची की नातं संपवायचं हे कसं ठरवायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 07:13 PM2023-06-29T19:13:17+5:302023-06-29T19:14:06+5:30

Is it alright to give a second chance to your cheating partner? जोडीदाराने आपल्याला फसवलं, धोका दिला तर त्याच नात्याला दुसरी संधी द्यायची की नातं संपवायचं हे कसं ठरवायचं?

Is it alright to give a second chance to your cheating partner? | जोडीदाराने विश्वासघात केला तर? नातं तोडायचं की दुसरी संधी द्यायची-कसं ठरवाल?

जोडीदाराने विश्वासघात केला तर? नातं तोडायचं की दुसरी संधी द्यायची-कसं ठरवाल?

लोकांची भेट हल्ली सोशल मीडियातही होते. भेटीचं रुपांतर अनेकदा मैत्रीत होते, नंतर प्रेमात व्हायला वेळ लागत नाही. पण लग्न झालेलं असून, कमिटेड असून किंवा साखरपूडा झालेला असतानाही दुसऱ्याच कुणाशी प्रेमप्रकरण सुरु झालं तर?  कळत - नकळत आपल्या जोडीदाराला अंधारात ठेवून अन्य संबंध तयार होत असतील आणि ते जर जोडीदाराला कळलं तर काय होतं? नातं तुटतं, घर तुटतं आणि विश्वासघाताचं दु:ख वाट्याला येतं.

अनेकदा तर संशयही घरादाराला चूड लावतो, अशावेळी काय करायला हवं? रिलेशनशिप कोच  विशाल भारद्वाज सांगतात, ''जोडीदारांचे नाते हे प्रेम - विश्वासावर टिकते. आपल्या जोडीदाराचे बाहेर काहीतरी आहे असे कळले किंवा संशय जरी आला तरी महिला पझेसिव्ह होतात. ओव्हर थिंकिंग करतात आणि खचून जातात. अशा वेळी लक्षात ठेवा ६ गोष्टी(Is it alright to give a second chance to your cheating partner?).

काय करायला हवे?

१.  कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व पुरावे गोळा करा. जर तुम्हाला ठोस पुरावा मिळाला तर, जोडीदाराशी जाऊन थेट बोला. पुरावा असल्‍याने  परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. शांततेने बोला, पुराव्यासकट मुद्दे मांडा.

२.  अफेअर या मुद्द्यावर बोलल्यानंतर २ गोष्टी समोर येतील. पहिली म्हणजे त्यांना तुमच्यासोबत राहायचं आहे की ब्रेकअप हवा आहे? दुसरी म्हणजे, त्यांना आपल्या चुकीची जाणीव होईल.

जोडीदाराचे ‘अफेअर’ आहे असे समजले तर अशावेळी नक्की काय कराल?

३. या कठीण काळात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. कारण जोडीदाराकडून अशी फसवणूक झाल्याने माणूस आतून तुटतो. ज्याचा परिणाम शरीरावरही दिसून येतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर आपण तंदुरुस्त असाल तरच, यातून बाहेर पडायला उर्जा मिळेल.

४.  अशा स्थितीत या सर्व गोष्टी जवळच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना शेअर करा. यामुळे तुमचे मन थोडे हलके होईल, तुम्हाला एकटे वाटणार नाही आणि तुम्हाला सल्लाही मिळेल.

५. जर आपल्याला मित्र किंवा कुटुंबियांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसेल तर, थेरपिस्ट किंवा विवाह सल्लागाराची मदत घ्या. ते तुम्हाला योग्य सल्ला देतील व मार्गदर्शनही करतील. ज्यामुळे तुम्हाला या प्रकरणातून बाहेर पडायला मदत मिळेल.

नातं टिकवायचं-रोमान्स वाढवायचा बिंधास्त बोला खोटं, ५ गोष्टी नेहमी सांगत राहा..

६.  परिस्थिती संपूर्ण समजल्यानंतर काय करायचं, काय करणे टाळावे, काडीमोड घ्यावे की नात्याला दुसरी संधी द्यावी हा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असावा. कारण निर्णयाचा नंतर पश्चाताप व्हायला नको.

Web Title: Is it alright to give a second chance to your cheating partner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.