Join us  

पिरिएड्सच्या 'त्या' ४ दिवसात सेक्स केलेलं चालतं का? याचा शरीरावर काय परीणाम होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 3:31 PM

Is it safe to have sex during menstruation : पीरियड्स दरम्यान सेक्स करता येतो, पण सुरक्षित सेक्स न केल्यास इन्फेक्शनचा धोका असतो.

संबंध आणि मासिक पाळीबद्दल आजही खुलेपणाने बोललं जात नाही. पिरिएड्समध्ये संबंध ठेवल्यानं गर्भधारणा होत नाही. इन्फेक्शन होऊ शकतं असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात. (Sexual Health) या कालावधीत शारीरिक संबंध ठेवावे की नाही आणि संसर्गाचा धोका आहे की नाही हे जाणून घ्यायला हवं. (Can You Have Sex During Your Period)

पीरियड्स दरम्यान सेक्स करता येतो, पण सुरक्षित सेक्स न केल्यास इन्फेक्शनचा धोका असतो. सुरक्षित सेक्समुळे स्त्री किंवा पुरुष दोघेही सेक्सचा आनंद घेऊ शकतात आणि ते हानिकारक नसते. (Is it safe to have sex during menstruation)

डॉ. रंजना धानू यांच्या म्हणण्यानुसार पिरिएड्समध्ये संबंध ठेवू नयेत. कारण निसर्गानं हा चार ते पाच दिवसांचा वेळ शेडींग करता दिला आहे. गर्भाशयाच्या आतून थर बाहेर येत असतात. अनेकींना असं वाटतं की मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील कचरा बाहेर पडतो. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे ताजं आणि स्वच्छ रक्त मासिक पाळीच्या दिवसात बाहेर पडत असतं. खरंतर या दिवसात संबंध ठेवल्यानंतर ब्लड दोन्ही बाजूंनी मागे जाऊन तुम्हाला फर्टिलिटीच्या समस्या उद्भवू शकतात.

म्हणजेच मूल होण्यात अडचण येऊ शकते किंवा वेदना जाणतात. मेन्स्ट्रल ब्लडला एक प्रकारचा वास येतो. त्यामुळे संबंध ठेवत असताना तुम्ही आणि तुमचा पार्टनर दोन्ही अन्कम्फर्टेबल होऊ शकता. दोन व्यक्ती एकमेकांना आनंद देण्यासाठी जवळ येत असतील तर अशावेळी मासिक पाळीचा रक्तस्त्राव हा इंटिमसीमध्ये व्यत्यय आणू शकतो आणि पार्टनरला पूर्ण आनंद मिळू शकणार नाही. 

मासिक पाळी दरम्यान खबरदारी न घेतल्यास केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्याने, स्त्री आणि पुरुष दोघांनाही एसटीआय होण्याची भीती असते, परंतु जेव्हा ते कोणत्याही संरक्षणाशिवाय लैंगिक संबंध ठेवतात तेव्हाच. या काळात महिलांची गर्भाशय ग्रीवा अधिक ओपन असते आणि योनीचे पीएच संतुलनही संतुलित योग्य नसते.

त्यामुळे त्यांना बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते आणि पुरुषांनाही या संसर्गाचा धोका असतो.  महिलांना खाजगी भागात दुर्गंधी येणे, सतत खाज सुटणे वेदनादायक शारीरिक संबंध, पुरळ उठणे, फोड किंवा व्रण, लघवी करताना वेदना,असामान्य रक्तस्त्राव अशा समस्या जाणवू शकतात. 

टॅग्स :लैंगिक जीवनहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स