Lokmat Sakhi >Relationship > Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स केल्याने घशाचा कॅन्सर होतो? ७ गोष्टी, लैंगिक आजारांचाही धोका टाळा

Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स केल्याने घशाचा कॅन्सर होतो? ७ गोष्टी, लैंगिक आजारांचाही धोका टाळा

Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स करण्यापूर्वी केवळ चुकीची माहिती, पोर्न, केवळ सनसनाटी काही या वाटेनं न जाता, लैंगिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 06:57 PM2022-04-14T18:57:20+5:302022-04-14T18:59:09+5:30

Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स करण्यापूर्वी केवळ चुकीची माहिती, पोर्न, केवळ सनसनाटी काही या वाटेनं न जाता, लैंगिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Is Oral Sex Good or Bad : Common Myths & Facts on Oral sex know Oral Sex Good or Bad | Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स केल्याने घशाचा कॅन्सर होतो? ७ गोष्टी, लैंगिक आजारांचाही धोका टाळा

Is Oral Sex Good or Bad : ओरल सेक्स केल्याने घशाचा कॅन्सर होतो? ७ गोष्टी, लैंगिक आजारांचाही धोका टाळा

ओरल सेक्स (Oral Sex)  या शब्दाची चर्चा समाज माध्यमात होते. कधी उघड तर कधी छुपी. कधी त्यातून पसरणारे आजार, होणारे त्रास, जोडीदारांवर केली जाणारी जबरदस्ती, त्या प्रकाराची किळस वाटणे, त्यातून येणारा मानसिक ताण, ट्रॉमा आणि थेट तुटणारी नाती इथपर्यंत या गोष्टी जातात. मुळातच लैंगिक सुखासंदर्भात शास्त्रीय सल्ला, समूपदेशन घेणं आपल्या समाजात कमी असल्यानं सगळी माहिती पिवळी पुस्तकं, आता रिल्स, पोर्न यातून मिळते. किंवा मग दोस्तांकडून मिळते. त्यामुळे आपल्या मानसिक-शारीरिक आरोग्यावर या क्रियेचे काय परिणाम होतील याचा विचारच केला जात नाही. (Common Myths & Facts on Oral sex know Oral Sex Good or Bad)

नात्यात फक्त एका माणसाचे सुख किंवा गरज किंवा आवड महत्त्वाची नसते तर दोघांची मर्जी आवश्यक असते. जर जोडीदाराला यासाऱ्या प्रकाराची किळस, घृणा असेल, शारीरिक त्रास होत असतील तर यावाटेनं न जाणंच योग्य.
आणि मुख्य म्हणजे एक्सप्लोअर करण्याच्या नादात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणंही धोक्याचं. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनने प्रसिध्द केलेल्या एका अभ्यासानुसार ओरल सेक्स आणि मल्टीपल पार्टनरसह ओरल सेक्स यानं घशाच्या कॅन्सरचा धोका वाढतो आहे.

१)ओरल सेक्स म्हणजे काय? (What Is Oral Sex)

उत्तेजनासाठी मुखाद्वारे लैंगिक अवयवांना स्पर्श करणे अशी त्याची व्याख्या. मात्र अशी लैंगिक क्रिया करताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण असुरक्षित ओरल सेक्समुळे लैंगिक संक्रमित रोग (STD) होऊ शकतात.

२) पार्टनरची परवानगी गरजेची

ओरल सेक्ससाठी महिला जोडीदाराची संमती आवश्यक असते.  सेक्स ही भावनांशी निगडीत प्रक्रिया आहे, ती जबरदस्ती करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे लग्नानंतरही बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानला जातो. त्यामुळे यासाठी तुमच्या जोडीदाराचे मन वळवा. जर तिला भिती वाटत असेल, नको असेल तर ओरल सेक्स टाळा. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ मेघा हजुरिया गोरे यांच्या मते, ओरल सेक्समध्येही भावनेचा विचार आवश्यक आहे. इच्छा, संमती नसताना ही गोष्ट योग्य नव्हे.



३) लैंगिक स्वच्छता

लैंगिक स्वच्छता आणि शारीरिक स्वच्छता याप्रकारातही अत्यंत महत्त्वाची. समोरच्याला किळस येईल असे वर्तन योग्य नव्हे. ते शरीरसुखही नव्हे आणि आरोग्याच्यादृष्टीनेही ते घातकच आहे.

४) कंडोम आणि ओरल सेक्स

कंडोमचा वापर ओरल सेक्ससाठी केला जातो. प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. रमण तन्वर म्हणतात, फ्लेवर्ड कंडोम हे मुख्यतः ओरल सेक्ससाठी डिझाइन केलेले असतात.  कंडोम 97% पर्यंत सुरक्षित मानले जातात, मात्र त्याचा वापर, त्यातली स्वच्छता, सुरक्षितता यांची काळजी घ्या.

५) तोंडाचे आरोग्य महत्त्वाचे

गर्भधारणा टाळायची म्हणून अनेकजण ओरल सेक्स करतात मात्र त्यातही तोंडाचे आरोग्य, घसा हे सारे अत्यंत महत्त्वाचे आणि बारकाईने सांभाळण्याची गरज आहे. कंडोमचा वापर अत्यंत आवश्यक आहे.



ओरल सेक्सचे धोके

१) ओरल सेक्समुळे कर्करोग होत नाही, परंतू लैंगिक आजार होऊ शकतात. अभ्यासकांना  असे आढळून आले आहे की ऑरोफॅरिन्क्स (घशाचा मध्यभाग) आणि टॉन्सिल्सचे काही कर्करोग हे विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) मुळे होण्याचा धोका असतो.

२) ओरल सेक्स काही जोडप्यांसाठी तणावाचे कारण बनतो आणि काहींसाठी जवळीक वाढवणारा ठरतो. फेअर ओक्स, कॅलिफोर्नियाच्या सेक्स थेरपिस्ट लुआन कोल वेस्टन म्हणतात की ओरल सेक्सचा ताण बहुतेक वेळा जोडीदाराच्या स्वच्छतेबद्दलच्या चिंतेशी संबंधित असतो. म्हणून ओरल सेक्ससाठी अनेकजण नकार देतात. याशिवाय एकाहून अनेक जोडीदार आणि ओरल सेक्स हे मात्र धोक्याचे ठरू शकते.

३) प्रोटेक्शन वापरल्याने एसटीडी होण्याचा धोका कमी होऊ शकतो. परंतु बहुतेक लोक ओरल सेक्ससाठी संरक्षण वापरत नाहीत. लैंगिकदृष्ट्या सक्रिय किशोरवयीन आणि प्रौढांमध्ये ओरल सेक्स करताना कंडोम न वापरण्याचे प्रमाण जास्त असल्याचे अमेरिकन अभ्यास सांगतात.

Web Title: Is Oral Sex Good or Bad : Common Myths & Facts on Oral sex know Oral Sex Good or Bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.