Lokmat Sakhi >Relationship > बॉयसोबर नावाचा नवा व्हायरल रिलेशनशिप ट्रेंड नेमका आहे काय? तरुण मुलामुलींना का व्हायचंय बॉयसोबर?

बॉयसोबर नावाचा नवा व्हायरल रिलेशनशिप ट्रेंड नेमका आहे काय? तरुण मुलामुलींना का व्हायचंय बॉयसोबर?

Is there really a new viral relationship trend called Boysober? Why do young boys and girls want to be boysobers? : तरुण मुलांच्या नात्यात नवाच ट्विस्ट, नेमका आहे काय हा नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 07:48 PM2024-08-27T19:48:46+5:302024-08-27T19:49:58+5:30

Is there really a new viral relationship trend called Boysober? Why do young boys and girls want to be boysobers? : तरुण मुलांच्या नात्यात नवाच ट्विस्ट, नेमका आहे काय हा नवा ट्रेंड

Is there really a new viral relationship trend called Boysober? Why do young boys and girls want to be boysobers? | बॉयसोबर नावाचा नवा व्हायरल रिलेशनशिप ट्रेंड नेमका आहे काय? तरुण मुलामुलींना का व्हायचंय बॉयसोबर?

बॉयसोबर नावाचा नवा व्हायरल रिलेशनशिप ट्रेंड नेमका आहे काय? तरुण मुलामुलींना का व्हायचंय बॉयसोबर?

डेटिंगचे (Dating Trend) ट्रेण्ड बदलत असतात. डेटिंगमधले प्रकार आपल्या ऐकिवात असतीलच (Relationship). पण सध्या चर्चेत असणारा 'बॉयसोबर' या ट्रेण्डबद्दल आपल्याला माहिती आहे का? बॉयसोबर हा एक कॉमन शब्द आहे (Boysober). जो मुले आणि मुली दोघांनाही लागू होतो. यामध्ये आपण टॉक्सिक रिलेशनशिपमधून (Toxic Relationship) बाहेर पडतो आणि नव्या आयुष्याला सुरुवात करतो. यामध्ये आपण दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा करत नसून, सेल्फ लव्ह अर्थात स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष देतो.

बॉयसोबर सध्या युरोप आणि अमेरिकेत जास्त प्रचलित आहे. यासह भारतीय तरुणांमध्येही  बॉयसोबरची चर्चा आहे. पण  बॉयसोबर नेमकं काय? याने आयुष्यात कोणते बदल घडतात?(Is there really a new viral relationship trend called Boysober? Why do young boys and girls want to be boysobers?).

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन कॉमेडियन होप वुडार्ड यांनी पहिल्यांदा बॉयसोबर हा शब्द वापरला होता. त्यानंतर हा शब्द तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होऊ लागला. या शब्दाचा अर्थ जाणून घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनात ‘बॉयसॉबर’ होण्याची इच्छा जागृत होऊ लागली आहे.

बॉयसोबरचे नियम

होप वुडार्डने बॉयसोबरचे नियमही स्पष्ट केले आहेत. त्यांच्या मते,

कितीही प्रेम असो जोडीदार ‘या’ ५ गोष्टी करत असेल तर समजा तुम्ही टॉक्सिक रिलेशनिशपमधेच आहात!

- 'टॉक्सिक' रिलेशनशिपमधून दूर राहणे.

- डेटिंग ॲपच्या जाळ्यात न अडकणे.

- आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे.

- कोणत्याही बंधनात न अडकता, स्वतःमध्ये आनंद शोधणे.

आपल्या मुलांनी ‘बॉयसॉबर’ व्हावे अशी पालकांची इच्छा

आजच्या जगात सोशल मीडियाचा वापर तरुणांच्या प्रगतीत अडथळा आणत आहे. सोशल मीडियाचं महत्त्व वाढल्यानंतर डेटिंगचा हा पारंपारिक प्रकार मागं पडला आहे. ऑनलाईन डेटिंग हा नव्या पिढीचा परवलीचा शब्द झाला आहे.

वॉशिंग मशिनचीही गरज नाही, झटपट धुता येतील बादलीभर कपडे-लक्षात ठेवा ५ गोष्टी

पण यामुळे काही लोकांच्या मेण्टल हेल्थवर परिणाम होतो. आणि स्वतःच्या ग्रोथकडेही दुर्लक्ष होतो. त्यामुळे ग्रोथकडे दुर्लक्ष न करता ‘बॉयसॉबर' ट्रेण्ड फॉलो करून आयुष्यात काहीतरी नवीन गोष्ट करा. तुमच्या ग्रोथकडे पाहून पालकही खुश होतील.

Web Title: Is there really a new viral relationship trend called Boysober? Why do young boys and girls want to be boysobers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.