Join us  

रोमॅंटिक स्ट्रॉंग रिलेशनशिपसाठी ‘डेट नाईटस’लाच जायला हवं हे चूक, हवी एकच महत्वाची गोष्ट, संशोधनातील निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2022 12:23 PM

डेटींग कराच पण चांगल्या नात्यासाठी इतरही गोष्टींकडे लक्ष द्या...

ठळक मुद्देजोडीदाराला वेळ द्याच, पण त्यासोबत स्वत:ला वेळ द्यायला विसरु नकातरच तुमचे नाते होईल स्ट्राँग...समजून घ्या मी टाइमचे महत्त्व

प्रत्येक नात्यात प्रेम, हक्क, आपुलकी हे ज्याप्रमाणे गरजेचे असते त्याचप्रमाणे नाते आणखी जास्त खुलवायचे असेल तर पुरेशी स्पेस, एकमेकांना दिले जाणारे स्वातंत्र्य या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यावर आपले नाते जास्त घट्ट होईल आणि आपल्यातील बॉंड वाढेल असे तुम्हाला जर वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. कारण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार नात्यात ज्याप्रमाणे डेटींग आणि प्रेम व्यक्त करणे गरजेचे असते त्याचप्रमाणे एकमेकांना पुरेशी स्पेस देणे किंवा ज्याला मी टाइम म्हटले जाते तेही सर्वात महत्त्वाचे असते. नात्यात एकमेकांना वेळ देणे जितके गरजेचे, तितकेच स्वत:ला वेळ देणेही गरजेचे असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. मी टाइम न दिल्याने जवळपास ४१ टक्के लोक आपल्या जोडीदाराला ठराविक काळानंतर सोडून देतात असे यामध्ये म्हटले आहे.

(Image : Google)

रिलेशनशिपमध्ये असलेल्या २ हजार जोडप्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यातील ८५ टक्के जणांनी स्वत:साठी वेळ काढणे चांगल्या नात्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले. स्वत:साठी योग्य आणि पुरेसा वेळ मिळाला तर आपले नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते असे त्यांनी म्हटले आहे. तर ५८ टक्के जण आपण आपल्या जोडीदाराला स्वत:मध्ये वेळ घालवण्यास सांगत असल्याचे म्हटले. वनपोल आणि एलिमेंटस मेसेज यांनी हे सर्वेक्षण केले होते. स्वत:ची काळजी घेणे आणि स्वत:ला वेळ देणे ही या जोड्यांमधील अनेकांचे प्राधान्य असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणानुसार स्वत:ला देण्यात येणारा वेळ हा दिवसाला ५१ मिनीटे किंवा आठवड्याला ६ तास इतका असल्याचे समजले. यामध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ हवा असणाऱ्यांचे प्रमाण ५७ टक्के तर फक्त स्वत:साठी वेळ हवा असलेल्यांचे प्रमाण ४६ टक्के इतके होते. तर आपल्या एकूण वेळापैकी जोडीदारासोबत डेटवर जाणे महत्त्वाचे वाटणाऱ्यांचे प्रमाण ४५ टक्के असल्याचे समोर आले. 

(Image : Google)

स्वत:ला वेळ देणे किंवा स्वत:सोबत वेळ घालवणे यामध्ये बहुतांश म्हणजे जवळपास ६० टक्के लोक कोचवर बसून राहणे आणि टिव्ही पाहण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसले. तर ५६ टक्के लोक पुस्तके वाचण्यात, ४२ टक्के लोक पॉडकास्ट ऐकण्यात आणि केवळ ३८ टक्के जण व्यायाम करण्यात आपला वेळ घालवत असल्याचे समोर आले. या गोष्टी करण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असल्याचे दिसले. तर एकट्याने जेवणे, एकट्याने कॉफी घेणे यातही अनेकांना आनंद मिळत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. कामाचा ताण असल्याने आवश्यक असणारा स्वत:साठीचा वेळ, तर सुट्ट्या असताना स्वत:साठी हवा असणारा वेळ आणि कौटुंबिक कारणांसाठी हवा असणारा वेळ जोडीदारांपैकी अनेकांना महत्त्वाचा वाटत असल्याचे दिसून आले. त्यामुळे रोमॅंटीक डेट नाइट रिलेशनशिपसाठी गरजेची असली तरी जोडीदाराला स्वत:चा वेळ देणही अतिशय आवश्यक असल्याचे यातून समोर आले. जोडीदाराला जितकी स्पेस मिळेल तितका तो नात्यात अधिक आनंदी राहू शकतो असा निष्कर्ष यातून दिसून आला. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप