इटलीच्या पंतप्रधान मेलोनी जॉर्जिया (Italian prime minister Giorgia Meloni) म्हणजे एक लढाऊ, खंबीर आणि तेवढंच सुंदर व्यक्तिमत्त्व. नुकत्याच झालेल्या जी- २० परिषदेनिमित्त त्या भारतात येऊन गेल्या आणि त्याचं व्यक्तिमत्व भारतीयांना आणखीन जवळून पाहता आलं. देशातल्या अतिमहत्त्वाच्या पदावर असताना स्वत:च्या आयुष्याबाबत एखादा निर्णय घेणे आणि तो सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभरात सांगणे याला खरोखरच धाडस लागतं. ते दाखवून जाॅर्जिया यांनी त्यांच्यातल्या लढाऊ, धाडसी वृत्तीची पुन्हा एकदा साक्ष दिली. एंड्रिया जियाम्ब्रूनो (Andrea Giambruno) आणि मेलोनी जॉर्जिया मागच्या १० वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. ते नातं आता संपलं (breakup) असलं तरी आमची मैत्री मात्र कायम आहे, असं त्यांनी नुकतंच जगजाहीर केलं आहे.
या दोघांना एक मुलगीही आहे. हे नातं असं तडकाफडकी का संपुष्टात आलं, याविषयी अनेकांना उत्सूकता आहे. एंड्रिया जियाम्ब्रुनो हे पत्रकार आहे. इटलीमध्ये ते घेत असलेला टॉक शो चांगलाच प्रसिद्ध आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यांबद्दल एंड्रिया यांनी मध्यंतरी एक भाष्य केलं हाेतं. त्यामध्ये त्यांनी त्या दोन सहकाऱ्यांबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरली होती. ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एंड्रिया यांच्यावर बरीच टिका झाली. याच कारणांमुळे आणि एंड्रिया यांच्या बदलत्या वृत्तीमुळे जॉर्जिया यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला, असं बोललं जातं.
पंतप्रधान पदावर असताना ब्रेकअप झालेल्या मेलोनी या पहिल्याच पंतप्रधान आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की ब्रेकअप झालं असलं तरी आमच्यात कोणतेही मतभेद अथवा भांडणे नाहीत, आमची मैत्री कायम आहे पण मार्ग फक्त वेगळे झाले आहेत. आम्ही दोघांनी सोबत घालविलेला काळ खूप छान होता. या कारणासाठी त्यांनी एंड्रिया यांचे आभारही मानले आहेत. ब्रेकअप होऊनही नात्यात अजिबात कटुता आलेली नाही, हेच त्यांच्या नात्याचं आणि त्यांच्यातल्या प्रेमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.