नातेसंबंधात एकमेकांना वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. रिलेशनशिपमध्ये वेळ दिल्याशिवाय नातं पुढे जात नाही. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातात. रिलेशनशिपचे देखील अनेक प्रकार आहेत. प्रेमात पडले तरी काहीजण कामासाठी वेगळ्या शहरांत राहतात. लाँग डिस्टंन्स रिलेशनशिप ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र असं नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. सतत ऑनलाइन एकमेकांना स्टॉक करणं चुकीचं तसंच संशय घेत सतत पहारे ठेवणंही. त्यातून अविश्वास निर्माण झाला तर नाती तुटतात. जेव्हा लाँग डिस्टंन्स रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा काही गोष्टी नक्की करा..
काय करता येईल?
१. मानसिक सोबत ठेवा
व्हिडिओ कॉल्स, ऑडिओ कॉल्स, मेसेजिंगच्या मदतीने एकमेकांशी कनेक्ट राहू शकता. तुमच्या जोडीदाराला अशी मानसिक सोबत हवीशी वाटू शकते. पण म्हणजे पहारा ठेवत मिंटामिटाचा हिशेब मागू नका.
२. लांब राहून राेमान्स
लांब राहूनही एकमेकांशी रोमॅण्टिक नातं ठेवता येतंच. आवडते सिनेमे एकत्र पाहणं, गाणी ऐकणं ते रोमॅण्टिक ऑनलाइन डेट असे कल्पक अनेक गोष्टी करता येतात.
३. रोज वेळ ठरवा
आपण आपल्या जोडीदारासोबत फोन, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅझेटच्या मदतीने संपर्कात राहू शकता. तो वेळ आपल्या जोडीदारासाठी राखून ठेवा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकमेकांसह प्रेमाने बोला, गेम खेळा, एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल.
४. भेटी हव्याशा
आजचे युग हे ऑनलाइन शॉपिंगचे आहे. अशा परिस्थितीत जोडीदारासाठी खरेदी करायला विसरू नका. तुमच्या जोडीदाराला चॉकलेट्स, गिफ्टस या सगळ्या गोष्टींनी सरप्राइज करा. अशा गोष्टी वेळोवेळी ऑर्डर करत राहा. याने नाते आणखी घट्ट होईल.