Lokmat Sakhi >Relationship > नात्यात वयातल्या अंतरापेक्षाही बरंच काही महत्त्वाचं असतं!-जुही चावला सांगतेय नवरा बायकोच्या नात्यातला आगळा रोमान्स

नात्यात वयातल्या अंतरापेक्षाही बरंच काही महत्त्वाचं असतं!-जुही चावला सांगतेय नवरा बायकोच्या नात्यातला आगळा रोमान्स

नवर्‍याच्या डोक्यावरचे गेलेले केस, त्याचं त्याच्या चेहर्‍यावरुन दिसणारं वय यामुळे जुहीलाच अनेकदा टीकेला, ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. पण जुही ही टीका, ट्रोलिंग जराही मनावर घेत नाही. कारण ती म्हणते, ‘माझं आणि जयचं नातं या टीकांना उत्तर देण्यापलिकडे गेलं आहे. या नात्यात वयाच्या अंतरापेक्षा बोलण्यासारखं खूप काही आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 03:03 PM2021-11-13T15:03:51+5:302021-11-13T15:15:11+5:30

नवर्‍याच्या डोक्यावरचे गेलेले केस, त्याचं त्याच्या चेहर्‍यावरुन दिसणारं वय यामुळे जुहीलाच अनेकदा टीकेला, ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. पण जुही ही टीका, ट्रोलिंग जराही मनावर घेत नाही. कारण ती म्हणते, ‘माझं आणि जयचं नातं या टीकांना उत्तर देण्यापलिकडे गेलं आहे. या नात्यात वयाच्या अंतरापेक्षा बोलण्यासारखं खूप काही आहे.

Juhi Chawala opene up on her mareeied life; Our Relationships are more important than age gap between us! | नात्यात वयातल्या अंतरापेक्षाही बरंच काही महत्त्वाचं असतं!-जुही चावला सांगतेय नवरा बायकोच्या नात्यातला आगळा रोमान्स

नात्यात वयातल्या अंतरापेक्षाही बरंच काही महत्त्वाचं असतं!-जुही चावला सांगतेय नवरा बायकोच्या नात्यातला आगळा रोमान्स

Highlights लग्नानंतर सुरुवातीची सहा वर्ष लग्न लपवणारी जुही नवर्‍यासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणानं तर बोलतेच पण नात्यातल्या अंतराकडे बघण्याची एक परिपक्व नजरही ती बोलता बोलता देते.जुही म्हणते, जर नवरा बायकोमधे खरं प्रेम असेल तर वयातलं अंतर सहा असो की सोळा वर्षं काय फरक पडतो?

अभिनेत्री जुही चावलाकडे पाहून ती 54 वर्षांची झाली आहे असं वाटतही नाही . वाढत्या वयातही तिच्या चेहर्‍यावरचं प्रसन्न हसू, नटखट भाव जराही कमी झालेले नाही. याबाबत जुहीचं नेहेमीच कौतुक होत असतं. पण जुही जेव्हा तिच्या नवर्‍यासोबत दिसते तेव्हा आजही तिच्यावर टीका होते की, तिने पैशासाठी एका म्हातार्‍या माणसाशी लग्न केलं. नवर्‍याच्या डोक्यावरचे गेलेले केस, त्याचं त्याच्या चेहर्‍यावरुन दिसणारं वय यामुळे जुहीलाच अनेकदा टीकेला, ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. पण जुही ही टीका, ट्रोलिंग जराही मनावर घेत नाही. कारण ती म्हणते, ‘माझं आणि जयचं नात या टीकांना उत्तर देण्यापलिकडे गेलं आहे. अशा टीकंचा आमच्या नात्यावर, आमच्या नात्यातील समंजसपणावर आणि आमच्यातल्या नात्यावर जराही परिणाम होत नाही.’

Image: Google

जुही म्हणते की आमचं हे नातं दुखांच्या घटनांमधून एकमेकांना समजून घेत, एकमेकांना आधार देत परिपक्व होत गेलं. जुही म्हणते, ‘आमचं लग्न गुप्तपणे झालं होतं. मी तेव्हा करिअरच्या शिखरावर होते आणि मला तिथे टिकून राहायचं होतं. त्यामुळे मधला मार्ग काढून वैवाहिक जीवन तर सुरळित ठेवायचं पण लग्न मात्र लपवायचं असा मधला मार्ग आम्ही काढला. लग्नानंतर सहा वर्षांनी मी गरोदर असताना आमच्या लग्नाचं जगाला कळलं. पण कौतुक राहिलं बाजूलाच, जयच्या वयस्कर लूकबद्दल लोक बोलू लागले. खरंतर माझं आणि जयमधलं अंतर हे फक्त सहा वर्षांचंच आहे. लग्नाच्या वेळेस मी 28 तर जय 33 वर्षांचा होता. वाढत्या वयाबरोबर जयचं वय त्याच्या चेहेर्‍यावर दिसत गेलं आणि मी मात्र स्वत:ला एक अभिनेत्री असल्यामुळे मेंटेन ठेवलं, त्यामुळे मी जयच्या तुलनेत आजही खूपच तरुण दिसते. पण म्हणून टीका होणं हे फारच विचित्र आहे. पण यामुळे आम्ही दोघेही चिडत, वैतागत नाही. कारण आम्हाला आमच्या दोघांमधल्या नात्याला आमच्या आयुष्यातल्या घटनांनी सुरुवातीलाच सामंजस्याच्या दिशेने वळायला लावलेलं होतं. जे नातं समजूतदारपणाच्या पायावर उभं असतं तिथे जगाला आपल्याबद्दल काय वाटतं यापेक्षा आम्हा नवरा बायकोला आम्हा दोघांबद्दल काय वाटतं हे खूप महत्त्वाचं ठरतं.’

 

जुही म्हणते, 'आम्ही भावनेच्या पातळीवर एकमेकांशी खूप घनिष्ठपणे जोडले गेलो आहोत. जय आधी माझा मित्र होता. तेव्हा तर त्याचं लग्नही झालं होतं. त्याचं त्याच्या बायकोवर अतिशय प्रेम होतं. पण एका अपघातात जयच्या पत्नीचं निधन झालं. त्यावेळेस जयला या दुखातून बाहेर काढण्यासाठी मी त्याचा आधार बनले. त्याकाळात जयच्या आईसोबत माझे चांगले नातेसंबंध तयार झाले. आमच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. आमच्यातलं शेअरिंग वाढत होतं. या नात्याला काय नाव द्यावं हे मात्र मला सूचत नव्हतं . तेव्हा जयनं हा प्रश्न सोपा केला. त्याने लग्नाची मागणी घातली. मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. लग्न ठरलं आणि त्याच वर्षी आईचा अपघातात मृत्यू झाला. मी तेव्हा लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हते. तेव्हा शाहरुख खाननं जितका मला आधार दिला तितकाच जयनंही. जिकडे बघावं तिकडे जय माझ्या समोर हजर असायचा. मला या दुखातून बाहेर काढण्याचा त्याने केलेला प्रयत्न यामुळे आम्ही दोघे आणखीनच जवळ आलोत आणि आम्ही लग्न केलं. तेव्हा फक्त करिअरसाठी म्हणून मला माझं लग्न लपवायचं होतं. आणि तेव्हा आजच्यासारखा मोबाइलचा कॅमेरा पाठलाग करत नव्हता, समाज माध्यमांचं व्यासपीठ नव्हतं आमच्या लग्नाची चर्चा व्हायला, त्यामुळे लग्न लपवणं सोपं गेलं इतकंच.’

जय आणि आपल्या नात्याबद्दल जुही मोकळेपणानं तर बोलतेच पण नात्यातल्या अंतराकडे बघण्याची एक नजरही ती बोलता बोलता देत असते. जुही म्हणते, ‘आमच्या लग्नाला 25 वर्षं झालीत. पण कधीही नात्यात आणि आमच्या प्रेमात वयातल्या अंतराचा मुद्दा डोकावला नाही. वय किंवा नात्यातलं अंतर हा फक्त एक आकडा असतो. त्यापलिकडे काहीच नाही. या आकड्यापलिकडे नवरा बायको म्हणून असलेलं तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातला समंजसपणा , तुमच्या आचार विचारांमधला ताळमेळ, तुम्ही एकमेकांना वैचारिक् आणि भावनिक पातळीवर एकमेकांना किती समजून घेता, किती ओळखता हे मुद्दे महत्त्वाचे असतात. याबाबतीत जर सर्व सकारात्मक असेल तर वयातल्या अंतरांचा , लोकांच्या टीकेचा प्रश्न येतोच कुठे?’

Image: Google

जुही म्हणते की, ‘ प्रेम आंधळं असतं, ते वय वगैरे काही बघत नाही हे खरं, पण माझ्या मते प्रेम हे खूप समंजसही असतं म्हणूनच ते वय , वयातला फरक यासारख्या गोष्टींना , त्यावर होणार्‍या टीकेला झेलू शकतं, त्याकडे दुर्लक्ष करु शकतं. आमच्या दोघांच्या नात्यात एकमेकांना समजून घेत सामंजस्यानं, एकमतानं पुढे जाणं याला आम्ही महत्त्व देतो. संसारात, कुटुंबात छोट्या छोट्या निर्णयासाठी एकमतावर यायला खूप संघर्ष करावा लागतो, झगडावं लागतं. पण नवरा बायको जर एकमेकांना नीट समजून घेणारे असतील तर हा संघर्ष टळतो हे आम्ही आमच्या नात्यात अनुभवलं आहे. त्यामुळे निर्णय कोण घेणार, कोणाचं मत प्रमाण मानायचं असा वाद आमच्यात कधी झालाच नाही.

लग्नामधे नवरा बायकोच्या नात्यातलं अंतर अजिबातच मॅटर करत नाही, परिणाम करत नाही असं जुहीला वाटत नाही. जुही म्हणते हे अंतर तेव्हाच मॅटर करतं जेव्हा लग्न करताना तुम्ही त्याबद्दल काहीही विचार केलेला नसेल तर वयातलं अंतर दोघांच्या नात्यावर परिणाम करतं हे नक्की. आजूबाजूला घडतंही असंच. पण आमच्याबाबतीत हे घडलं नाही कारण लग्नानंतर आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागणार आहे , ती परिस्थिती आम्ही कशी हाताळणार याबद्दल आम्हा दोघांनाही नीट कल्पना होती. मग वयातल्या अंतराचा प्रश्न येतोच कुठे?

Image: Google

जुही नवरा बायकोच्या वयातल्या अंतरावर शेवटी एवढंच म्हणते की, जर नवरा बायकोमधे खरं प्रेम असेल तर वयातलं अंतर सहा असो की सोळा वर्षं. त्याचा परिणाम नात्यावर होत नाही. हा माझा नव्हे जय आणि माझा अनुभव आहे!’
नवरा बायको म्हणून दोघांच्या वयातल्या अंतरावर खोटं नाटं सांगून आतल्या आत कुढणार्‍यांसाठी जुहीचं एवढं उत्तर त्यांच्या मनातला गुंता सोडवण्यास नक्कीच मदत करेल. नाही का?

Web Title: Juhi Chawala opene up on her mareeied life; Our Relationships are more important than age gap between us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.