२५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून बॉलीवूडमध्ये राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. कित्येक नव्या अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण काजोल आणि तिच्या भोवती असणारं ग्लॅमरस वलय मात्र अजूनही कायमच आहे. लाखो चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी काजोल (Kajol) आज ४९ वर्षांची झाली आहे. तरीही अजूनही तिचा ग्रेस आणि तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. म्हणूनच तर अशा या आपल्या बायकोच्या कौतुकात अजय देवगण (Ajay Deogan) दिवाना असून त्याने चक्क 'तारीफ करू क्या तेरी....', असं म्हणत काजोलला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत (5th August-Kajol's Birthday). नवरा अजय देवगण, मुलगी न्यासा आणि मुलगा युग यांच्यासह इतर कुटुंबीयांसमवेत काजाेल आज वाढदिवस साजरा करते आहे.
काजल आणि अजय देवगणची जोडी म्हणजे बॉलीवूडचं एक हिट कपल. बॉलीवूडमध्ये कित्येक नाती काही महिन्यात तुटत असताना अजय आणि काजोल यांचं नातं आदर्श मानलं जातं.
मुलांच्या डब्यासाठी करा ‘डाळींचे आप्पे’! चविष्ट गरमागरम नाश्ता- रेसिपी सोपी आणि पौष्टिक
त्यांच्या या आदर्श नात्याची पुन्हा एकदा नव्याने ओळख पटावी, अशीच पोस्ट अजयने काजोलच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केली आहे. यात त्याने काजोलचं कौतूक करण्यासाठी 'तारिफ करू क्या...', या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी वापरल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने त्या दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांना काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे.
त्यात अजय आणि काजोल यांच्यापैकी कोणामध्ये जास्त संयम आहे, कोण उत्तम संवादक आहे, कोण चांगला स्वयंपाक करतो, असे प्रश्न विचारलेले आहेत
Friendship Day: १०० रूपयांपेक्षा कमी किमतीत मित्रमैत्रिणींना द्या ६ भन्नाट गिफ्ट, दोस्त होतील खुश
आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजयने काजोल अशी दिली आहेत. काजोलच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ आणि अजयची पोस्ट सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Tareef karu kya teri... Happy Birthday @itsKajolD ♥️ pic.twitter.com/jTIlwpOSTj
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 5, 2023