Join us  

डायनिंग टेबलवर फोन घेऊन बसणाऱ्या कतरिना कैफला विकी कौशलही नेहमीच वैतागतो आणि म्हणतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 6:36 PM

Katrina Kaif Reveals About Her Phone: तुमच्याही घरी हेच चित्र दिसतं का, तुमचाही जोडीदार जेवताना फोन हातात घेऊन बसलेला असतो...

ठळक मुद्देआपल्याही कुटूंबात थोड्या फार प्रमाणात तसंच तर असतं. दोघांपैकी एकाला मोबाईल पाहात जेवणं आवडतं तर दुसऱ्याला याच गोष्टीचा जाम तिटकारा येतो.

नवरा- बायको, त्यांची मुलं, घरातले इतर सगळे सदस्य जेवणासाठी एकत्र बसले आहेत. एकमेकांशी बोलत आहेत, दिवसभरातल्या सगळ्या गमतीजमती एकमेकांना सांगत हसत-खेळत जेवत आहेत, असं चित्र आता हातावर मोजण्याइतक्या मोजक्या कुटूंबात दिसत असेल. बाकीच्या बहुतांश घरांमध्ये मात्र जेवताना सगळे एकत्र बसून जेवत तर असतात, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. ज्यांच्याकडे मोबाईल नसतो, त्यांच्या नजरा टीव्हीवर खिळलेल्या असतात. असंच काहीसं अभिनेत्री कतरिना कैफच्या घरातही आहे. म्हणूनच तर तिचा नवरा विकी कौशल तिच्यावर जाम वैतागतो... (Katrina kaif says her husband vicky kaushal always ask her to put down phone on dinner table)

 

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलीवूडचं एक मस्त जोडपं. दोघेही आपापल्या कामात अतिशय बिझी. कतरिना तर अभिनयासोबतच स्वत:चा कॉस्मेटिक्स ब्रॅण्डही सांभाळते. त्यामुळे साहजिकच तिच्यावर दुहेरी जबाबदारी असल्याने ती खूप व्यस्त असते.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

पण तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी जेवणासाठी एकत्र आल्यावर मात्र तुमचे फोन तुमच्यापासून दूर ठेवा. घरातल्यांशी बोला, गप्पा मारा असं विकीला वाटतं. आणि कतरिनाचं नेमकं तिथेच हुकतं.. आता झालं शेवटचं एक काम... बस्सं एवढंच राहीलं.. असं म्हणत ती तिची कामं उरकत बसते. विकी तिची वाट पाहातो आणि एका पॉईंटला ते सगळं असह्य झाल्यावर तिला मोबाईल बाजुला ठेवून आधी जेवण करून घे, असं जरा रागमिश्रीत प्रेमाने सांगतो.

 

दोघांमधला थोडा मजेशीर, थोडा त्रासदायक किस्सा कतरिनाने स्वत:च इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितला आहे. आपल्याही कुटूंबात थोड्या फार प्रमाणात तसंच तर असतं. दोघांपैकी एकाला मोबाईल पाहात जेवणं आवडतं तर दुसऱ्याला याच गोष्टीचा जाम तिटकारा येतो.

कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

काही काही घरात तर नवरा- बायको दोघेही मोबाईल बघत जेवण्यात गुंतून गेलेले असतात. अशावेळी आपण काय खात आहोत, कोणत्या पदार्थाची चव कशी आहे, पोट खरंच भरलं आहे का, आपण गरजेपेक्षा जास्त तर जेवत नाही ना, याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं. मोबाईल बघत जेवणाऱ्यांपैकी ९५ टक्के लोक टाईमपास म्हणून मोबाईल बघत असतात. आधीच प्रत्येक जण आपापल्या कामात अडकला आहे. त्यात रात्रीचं जेवणही मोबाईल बघत सुरू असतं.. अशावेळी आपणच क्षणभर विचार करावा की आपल्या हातातलं हे यंत्र महत्त्वाचं आहे की आपल्याशेजारी बसलेली माणसं? आपोआपच उत्तर मिळेल कदाचित  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपकतरिना कैफविकी कौशलमोबाइल