Lokmat Sakhi >Relationship > Kiss Day Special : चुंबन घेतल्यानं वजन कमी होते, संशोधन सांगते किस आणि कॅलरी बर्नचं गणित

Kiss Day Special : चुंबन घेतल्यानं वजन कमी होते, संशोधन सांगते किस आणि कॅलरी बर्नचं गणित

Kissing - how to burn calories effectively : ओठांवर चुंबन घेतल्याने खरंच वजन कमी होते? नक्की खरं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 02:02 PM2024-02-13T14:02:40+5:302024-02-13T14:04:12+5:30

Kissing - how to burn calories effectively : ओठांवर चुंबन घेतल्याने खरंच वजन कमी होते? नक्की खरं काय?

Kissing - how to burn calories effectively? | Kiss Day Special : चुंबन घेतल्यानं वजन कमी होते, संशोधन सांगते किस आणि कॅलरी बर्नचं गणित

Kiss Day Special : चुंबन घेतल्यानं वजन कमी होते, संशोधन सांगते किस आणि कॅलरी बर्नचं गणित

प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेण्टाइन डे. या दिवशी प्रत्येक साथीदार आपल्या लव्हेबल पार्टनरसाठी खास गोष्टी करतात. शिवाय व्हॅलेण्टाइन विकदरम्यान, साजरे होणारे दिवस देखील आनंदाने सेलिब्रेट करतात. आज किस डे. किस करण्याच्या अनेक प्रकार आहेत. काही जण, गालावर, माथ्यावर, डोळ्यांवर, हातावर, मानेवर तर कोणी ओठांवर चुंबन देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात (Valentine Day 2024).

पण ओठांवर चुंबन घेतल्याने वजन कमी होते असेही म्हटले जाते, यात कितपत तथ्य आहे? चुंबनामुळे नात्यात प्रेम, आपुलकी, गोडवा, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते (Kiss Day Special). पण किस आणि कॅलरीजचा संबंध काय? यामुळे लठ्ठपणा खरंच कमी होते का?(Kissing - how to burn calories effectively).

अमेरिकेच्या लुईसविले विद्यापीठातील अभ्यासानानुसार, चुंबनामुळे नात्यात प्रेम वाढते. विशेषतः जेव्हा पार्टनर प्रेमाने आपल्या ओठांचे चुंबन घेतो, तेव्हा शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे शरीराला मिळतात. मुख्य म्हणजे एक तास चुंबन घेतल्याने १०० कॅलरीज बर्न होतात.

हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..

चुंबन घेतल्याने वजन कमी होते?

विद्यापीठातील अभ्यासानुसार, एका मिनिटासाठी चुंबन घेतल्याने शरीरातील कॅलरीज जलदरित्या बर्न होतात.  याव्यतिरिक्त, शरीराची चयापचय क्रिया बुस्ट होते. ट्रेडमिलवर जॉगिंग केल्याने एका मिनिटात अंदाजे ११ कॅलरीज बर्न होतात. पण चुंबन घेताना कॅलरीज बर्न करण्याची प्रोसेस वेगाने काम करते.

जेव्हा आपण जोडीदाराचे चुंबन घेतो, तेव्हा मन प्रसन्न होते. आनंदी राहिल्याने मानसिक आरोग्य सुधारते. जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना चुंबन घेतल्याने शरीरातील ८ ते ९ कॅलरीज बर्न होतात. शिवाय या क्रियेदरम्यान, आपण त्यांना ३९० वेळा चुंबन दिल्यास अर्ध्या किलो पर्यंत वजन घटू शकते.

किसिंगचे फायदे

१- शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

२- रिलेशनमधील बंध मजबूत होते.

३- सकारात्मक ऊर्जा प्रप्प्त होते. मानसिक स्थिती सुधारते.

४- किस केल्याने शरीरातील चयापचय क्रिया वाढते.

५- अनेक अभ्यासांमध्ये असेही आढळून आले आहे, की चुंबनामुळे चेहरा, मान आणि जबड्याचे स्नायू टोन होतात. चुंबन घेताना अनेक स्नायू काम करतात, ज्यामुळे चेहरा आकारात येतो.

'ऐसा लग रहा है, मै जन्नत के बिचोंबीच खडी हूं!' - पाहा काश्मिरी मुलींचे सुंदर निरागस रिपोर्टिंग

६- जेव्हा आपण चुंबन घेतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात ऍन्टीबॉडीज सोडले जातात, जे बॅक्टेरिया नष्ट करतात.

७- चुंबन तोंडात लाळेचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटी निर्माण होत नाही.

८- चुंबन सेरोटोनिन, डोपामाइन सारखे आनंदी संप्रेरक निर्माण करतात. ज्यामुळे मूड सुधारतो.

Web Title: Kissing - how to burn calories effectively?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.