आयुष्यात सोबत असावी, एकमेकांसोबत गोष्टींचे शेअरींग आणि केअरींग करण्यासाठी आपण लग्न करतो खरे. पण कालांतराने हे नाते जुने होते आणि नात्यात तोच तो पणा यायला लागतो. मात्र असे होऊ नये आणि नात्यात कायम नाविन्य राहावं यासाठी जोडीदारांपैकी दोघांनाही थोडे कष्ट घ्यावे लागतात. तरच नात्यातला नवेपणा टिकतो आणि नेहमीचंच नातं आणखी सुंदर होण्यास मदत होते. लग्न झाल्यावर काही वर्ष नवरा-बायकोमधला रोमान्स, प्रेम हे सगळं नवं असल्याने सुंदर असतं पण जसे दिवस जातात तसे रोजच्या व्यवहारात प्रेम मागे पडतं आणि नात्यात तोच तो पणा येतो. असं होऊ नये यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अंकुर वारीकू नवरा बायकोचं नातं बहरण्यासाठी काही गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया (Know How to maintain romance in your relationship)...
१. नवरा बायकोचं नातं असं असतं की या नात्यात बरेचदा २ लोक एकमेकांसोबत किंवा कुटुंबासोबतच वेळ घालवतात. पण यामुळे आपल्याला आपली स्वत:चीक. अशी स्पेस राहत नाही. मात्र एकमेकांना वेळ देताना जोडीदारांपैकी दोघांनी स्वत:साठी आवर्जून वेळ काढायला हवा. या स्पेसमुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि नकळत नाते दृढ होण्यास मदत होते.
२. आपल्याला प्रत्येक गोष्ट सोडवण्याची घाई असते. पण प्रत्येक गोष्ट सोडवायला जाऊ नका. काहीवेळा समोरच्याच्या काही गोष्टी सोडून द्यायला हव्यात. सतत सगळं धरुन ठेवल्याने आणि त्याबाबत वाद घालत बसल्याने वाद वाढत जातात.
३. जोडीदारांपैकी दोघांनाही आपले असे काही मित्र मैत्रीणी असायला हवेत. आपल्याला आपले सगळे मित्र मैत्रीणी कायम एकत्रच भेटायला हवेत असं काही नाही. आपण आपल्या मित्रमैत्रीणींना जोडीदाराशिवाय भेटायला हवे. म्हणजे आपले असे एक वेगळे जग आपल्याला असते.
४. अनेकदा आपल्या पार्टनरला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे पासवर्ड आपण शेअर करतो. पण असे करणे योग्य नाही. आपलं वैयक्तिक आयुष्य आणि सिक्रसी यामध्ये फरक आहे. तो फरक समजून आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करायला हव्यात.