Join us  

म्हणे वर्क-लाइफ बॅलन्स करा, पण कसे? फक्त ३ गोष्टी करा, स्ट्रेस कमी-जगा आनंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 3:43 PM

Know How To maintain Work-life Balance : नेमकं काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर...

ऑफीसचं काम आणि घर किंवा पर्सनल लाईफ या गोष्टींचा समतोल साधणं ही अनेकदा तारेवरची कसरत असते. सध्या अनेकांना वर्क फ्रॉम होम असल्याने किंवा हायब्रिड मॉडेल आहे. घरातून काम करत असल्याने तर कामाचा फिलच येत नसल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. स्त्रियांसाठी तर घर, मुलं, ऑफीस हे सगळं एकावेळी सांभाळताना फारच ओढाताण होत असल्याचे दिसते. कधी ऑफीसच्या डेडलाईन्स, टार्गेटस तर कधी मुलांची आजारपणं, परीक्षा, सणवार हे सगळे करताना होणारी ओढाताण वेगळीच असते. मात्र या दोन्ही गोष्टी त्या त्या जागी ठेवल्या तरच जगणं आनंदी, ताण कमी असणारं होऊ शकतं. हे सगळं आपल्याला माहित असतं पण त्यासाठी नेमकं काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्याची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंकुर वारीकू हे लाईफ कोच वर्क लाईफ बॅलन्स करायचं असेल तर कोणत्या ३ गोष्टी करायला हव्यात याविषयी सांगतात. पाहूयात ते कोणते महत्त्वाचे ३ मुद्दे सांगतात (Know How To maintain Work-life Balance). 

१. बायकोसोबत आपले महिन्याचे कॅलेंडर शेअर करा. म्हणजे आपले ऑफीसचे आणि इतर शेड्यूल काय आहे ते तिला समजेल. इतकेच नाही तर तिला आपल्याकडून काही वेळाची किंवा घरातल्या गोष्टींसाठी काही मदत हवी असल्यास ती त्याप्रमाणे त्यामध्ये गोष्टी समाविष्ट करु शकेल. यामुळे एकमेकांच्या शेड्यूलमुळे घरातील गोष्टी सफर होणार नाहीत आणि घरातील गोष्टींमुळे काम सफर होणार नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधणे यामुळे सोपे जाईल. 

(Image : Google)

२. ऑफीसचा आणि वैयक्तिक फोन वेगवेगळे ठेवायला हवेत. फोन जमले नाही तर किमान दोन्ही सिम कार्ड तरी वेगळी हवीत. त्यामुळे आपल्या पर्सनल स्पेसमध्ये ऑफीस येणार नाही. हे दोन्ही वेगळे असल्यास आपले आयुष्यही नक्कीच सॉर्टेड राहण्यास मदत होईल. दोन्ही एकत्र असेल तर त्यामध्ये मर्यादा घालणे अवघड होते आणि मग नकळत आपले ताण वाढत जातात. 

३.  आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी ठराविक वेळ आवर्जून काढा. ही गोष्ट कोणतंही नातं चांगलं टिकण्यासाठी अतिशय आवश्यक असते. विकेंड हा आपण साधारणपणे आपल्या फॅमिलीसाठी राखून ठेवतो. पण यात एकच सुट्टी असेल, पाहुणे येणार असतील किंवा सणावाराची तयारी, साफसफाई असं काही असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वेळ मिळतोच असे नाही. अशावेळी आपल्या पार्टनरसाठी आवर्जून आठवड्यातील एक संध्याकाळ किंवा दुपारचे एकत्र जेवण, एखादी लहानशी ड्राईव्ह असं प्लॅन करु शकतो. यामुळे नात्यातला जिव्हाळा टिकून राहण्यास नक्कीच मदत होते. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमानसिक आरोग्यलाइफस्टाइल