Lokmat Sakhi >Relationship > प्यार किया तो डरना क्या! आधी पतीकडून घटस्फोट, नंतर समलिंगी जोडप्यानं मंदिरात केलं लग्न

प्यार किया तो डरना क्या! आधी पतीकडून घटस्फोट, नंतर समलिंगी जोडप्यानं मंदिरात केलं लग्न

Kolkata same sex marriage divorce : दोन मुलींनी  मंदिरात पारंपारीक पद्धतीनं लग्न केलं आहे.  मौसमी दत्ता आणि मौमिता मुजूमदार अशी या दोघींची  नावं आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:54 AM2023-05-25T11:54:17+5:302023-05-25T12:29:48+5:30

Kolkata same sex marriage divorce : दोन मुलींनी  मंदिरात पारंपारीक पद्धतीनं लग्न केलं आहे.  मौसमी दत्ता आणि मौमिता मुजूमदार अशी या दोघींची  नावं आहेत.  

Kolkata same sex marriage divorce from husband and then the girl married to girl photos viral | प्यार किया तो डरना क्या! आधी पतीकडून घटस्फोट, नंतर समलिंगी जोडप्यानं मंदिरात केलं लग्न

प्यार किया तो डरना क्या! आधी पतीकडून घटस्फोट, नंतर समलिंगी जोडप्यानं मंदिरात केलं लग्न

समलैंगिक व्यक्तींच्या अधिकारांवरून देशात नेहमीच वाद सुरू असतात. आपल्याला इतरांप्रमाणे सर्व अधिकार मिळावेत या मागणीने गेल्या काही वर्षात जोर धरला आहे. अशातच कोलकाता येथील एक समलिंगी जोडपं चर्चेचा विषय ठरलं आहे. कोलकात्यात अशा प्रकारचे विवाह होणं हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. दोन मुलींनी  मंदिरात पारंपारीक पद्धतीनं लग्न केलं आहे.  मौसमी दत्ता आणि मौमिता मुजूमदार अशी या दोघींची  नावं आहेत.  रविवारी मध्यरात्री त्यांनी मंदिरात गुप्तपणे लग्न गेलं. नंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी लोकांना आपल्या लग्नाबद्दल माहिती दिली. (Kolkata same sex marriage divorce from husband and then the girl married to girl photos viral)

या दोघांची भेट कशी झाली?

या जोडप्यानं माध्यमाशीं बोलताना सांगितले की दत्ता आधीपासूनच विवाहित असून तिला दोन मुलंही आहेत. दत्ताच्या म्हणण्यानुसार तिचा पती तिला रोज मारहाण करत असे. याच कारणावरुन तिनं घटस्फोट घेण्याचं ठरवलं. मात्र दोन्ही मुलांची जबाबदारी आपण घेणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघी एकमेकांच्या संपर्कात आल्या. (मौसमी दत्ता आणि मौमिता मजूमदार) दोघींनी लग्न करण्याचं ठरवल्यानंतर  मौमितानं मौसमीच्या दोन्ही मुलांना स्वखुशीनं स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 

सध्या या दोघीही उत्तर कोलकाता येथे भाडे तत्त्वावर घेतलेल्या घरात राहत असून आपल्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टाकडून अनुकूल निकाल लागला किंवा नाही तरी आम्ही कायम सोबत असू असे या दोघींचे म्हणणे आहे.

समलिंगी विवाहाच्या प्रमाणपत्राला न्यायालय परवानगी देत ​​नसले तरी कोणताही नियम त्यांना एकत्र राहण्यापासून रोखू शकत नाही, असा दावा दोघींनी केला आहे. याआधीही कोलकाता येथे असे अनेक विवाह झाले आहेत. वर्षानुवर्षे एकत्र आनंदाने राहणारे सुचंद्र आणि श्री दोघेही आता शहरातील LGBTQ हक्क चळवळीचे लोकप्रिय चेहरे आहेत.

याआधी अभिषेक रे आणि चैतन्य शर्मा या दोन पुरूषांचा खास विवाह सोहळा कोलकात्यात पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अभिषेक रे हे कोलकातास्थित डिझायनर आहेत. त्याने आपला खास मित्र चैतन्य शर्मासोबत लग्न केले. कोलकात्याच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडले होते. 

Web Title: Kolkata same sex marriage divorce from husband and then the girl married to girl photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.