Lokmat Sakhi >Relationship > लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय आणि ६ धोके, ‘हो’ म्हणण्यापूर्वी विचार केलाय का?

लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय आणि ६ धोके, ‘हो’ म्हणण्यापूर्वी विचार केलाय का?

Live in Relationship लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय अनेकजण स्वीकारत असले तरी त्या नात्यातले खाचखळगेही बघायलाच हवेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 06:53 PM2022-11-03T18:53:00+5:302022-11-03T18:54:41+5:30

Live in Relationship लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय अनेकजण स्वीकारत असले तरी त्या नात्यातले खाचखळगेही बघायलाच हवेत.

Live in relationship decision and 6 problems, have you thought before saying 'yes'? | लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय आणि ६ धोके, ‘हो’ म्हणण्यापूर्वी विचार केलाय का?

लिव्ह इन रिलेशनशिपचा निर्णय आणि ६ धोके, ‘हो’ म्हणण्यापूर्वी विचार केलाय का?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय हल्ली अनेक कपल्स घेतात. लग्नापूर्वी एकत्र राहण्यास, आपल्या जोडीदाराला समजून मग लग्नाचा निर्णय घेणं असंही काहीजण करतात. त्यातल्या नैतिक अनैतिक वादात न जाता समजा, लिव्ह इन नातं स्वीकाराण्यापूर्वी काय तपासून घ्यायला हवे? कशाने धोका आणि फसवणूक टाळता येईल याचा वेळीच विचार केलेला बरा..

मैत्री-प्रेम की लग्नाचा विचार

लिव्ह इन रिलेशनपूर्वी आपल्या पार्टनरचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. मुळात आपली मैत्री आहे की एकमेकांवर प्रेम आहे. नात्यात आपण नक्की काय कमिट करतो आहोत, आर्थिक व्यवहारांचं काय, घरकाम ते जॉब यासाऱ्याचं काय याचा बारकाईने विचार करायला हवा.

निर्णय घेताना विचार करा

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येणे हा लग्नासारखाच मोठा निर्णय आहे. एकत्र राहत असताना तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर याविषयी विचार करा. नाहीतर नंतर पश्चाताप व्हायला नको. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये खोटी आश्वासने देणे या रिलेशनशिपसाठी धोखादायक ठरू शकते. 

घरातील खर्चिक बाजूंबाबत करा चर्चा

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असेल तर दोघांनी एकत्र कामं वाटून घेतली पाहिजे. आणि घरातील होणाऱ्या खर्चिक बाजूंबाबत देखील एक प्लॅन तयार करावे. घरातील खर्च उचलण्यापूर्वी घरासाठी कोण किती खर्च उचलणार, याची बजट प्लॅनमध्ये नोंद करून घ्यावी. 

घरातील कामे वाटून घेणे

घरातील जितके कामे आहेत ते वाटून घेणे, कारण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये खर्चिक बाजू दोघेही सांभाळत असतील. तर, घरातली कामे देखील वाटून घेतली पाहिजे. आणि जबाबदारीने ते कामे केली पण पाहिजे. 

रागात मर्यादा ओलांडू नका

नातं म्हटलं की थोडा तर ताण येणारच. याने नाते मजबूत होतात परंतू लिव्ह-इन रिलेशनमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यास रागात वायफळ बडबड करू नये. अनेकदा क्रोधात व्यक्ती वाटेल ते बोलत सुटतो परंतू जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. कारण वेळ निघाल्यावर देखील त्या गोष्टी मनातील एखाद्या कोपऱ्यात दाटून राहतात. राग आल्यावर हे लक्षात ठेवा की या कारणामुळे आपल्या नात्यात फुट देखील पडू शकते.

नातं तुटू शकतं..

लिव्ह इन नात्यात आपण प्रेमात पडलो तरी नातं तुटू शकतं, हे कायम लक्षात ठेवावं. त्यातून बाहेर पडावंही लागेल याची कल्पना असलेली बरी.

Web Title: Live in relationship decision and 6 problems, have you thought before saying 'yes'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.