Join us  

का रे दुरावा? विवाहित जोडप्यांमधला हरवला रोमान्स, नात्यातल्या दुराव्याची कारणं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:07 PM

काही लोकं फारच रूक्ष असतात. जोडीदार आपल्यावर प्रेम करतोय, आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करतोय, हे त्यांच्या गावीही नसतं... कारण.... 'प्यार की भाषा' किंवा 'लव्ह लँग्वेज' त्यांना येतच नाही. 

ठळक मुद्देकाही जुन्या चित्रपटांमधून हमखास दिसणारा एक सीन म्हणजे ऑफिसमधून येताना नवऱ्याने बायकोसाठी आणलेला गजरा.छोट्या छोट्या गोष्टीतून नक्कीची प्रेम व्यक्त करता येते आणि मिळवता येते.

काय आहे बुवा ही प्यार की भाषा ?.... तुम्हाला येत नसेल, तर शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण जर नात्यातली नवलाई टिकवायची असेल, तर प्रेमाची ही भाषा तर तुम्ही शिकायलाच हवी... प्रेम व्यक्त करणं  किंवा प्रेम समजून घेणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. दोन्ही जोडीदार प्रेमाची भाषा समजून घेणारे असतील तर ठिकच आहे. किंवा मग दोघेही रूक्ष असतील, तरीही रूसण्या- फुगण्याचा प्रश्नच नाही. पण दोघांपैकी एक जण अगदीच हौशी आणि एक जण फारच बोअरिंग असेल... तर मात्र जोडप्यांमधला रोमान्स संपून जातो आणि नात्यातली मजाच जणू निघून जाते.

 

लव्ह लँग्वेज आहे ही अशी...

१. स्पर्श कधी कधी काही बोलायचे नसले तरी एकमेकांना अबोलपणे केलेला स्पर्श खूप काही सांगणारा असतो. त्यामुळे जर आपला जोडीदार स्पर्शातून काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तो समजून घ्या. जोडीदार कामामध्ये व्यस्त असताना किंवा खूप तणावात असताना हातावर हात ठेवून दिलेला आधारही खूप मोठा वाटतो. या छोट्या छोट्या गोष्टीतून नक्कीची प्रेम व्यक्त करता येते आणि मिळवता येते.

 

२. गिफ्ट्सकाही जुन्या चित्रपटांमधून हमखास दिसणारा एक सीन म्हणजे ऑफिसमधून येताना नवऱ्याने बायकोसाठी आणलेला गजरा. हा प्रसंग अगदी छोटासा असतो. पुरता एक मिनिटही चालणारा नसतो. पण या एवढ्या छोट्या प्रसंगातून नवऱ्याचे बायकोवरील प्रेम दिसून येते. म्हणूनच तर भेटवस्तू खूप महागडी नसेल तरी चालते. पण काही ना काही भेटवस्तू नक्कीच देत रहा. मग ते अगदी छोटेसे चॉकलेट असेल तरी चालते. पण आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी काहीतरी आणले आहे, हीच भावना मुळात खूप सुखावणारी असते. 

 

३. कौतूक कराआपला जोडीदार सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट असतोच असे नाही. कारण आपणही तसे नसतो. हे सत्य स्विकारा. जोडीदाराला काय येत नाही, यापेक्षा काय येते याकडे लक्ष द्या. तसेच जोडीदार कोणत्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करतो, हे देखील बघा. जोडीदाराच्या गुणांचे भरभरून कौतूक करा. तुमचे हे कौतूक तुमच्यातले प्रेम नक्कीच वाढवेल.

 

४. सहकार्य करानवऱ्याने आपल्या कामात मदत करावी किंवा बायकोने आपले काही काम करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. तुमच्या मागे कामाचा लोड असला तरी एखाद्या वेळी निवांत असताना जोडीदाराला त्याच्या कामात नक्कीच मदत करा. एकमेकांना सहकार्य केल्यानेही नात्यात खूप गहिरेपणा येतो. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप