Lokmat Sakhi >Relationship > ‘विवाहित पुरुषा’वर प्रेम, लग्न आणि पालकांचा विरोध; शबाना आझमी सांगतात तरुण वयातलं अवघड वळण..

‘विवाहित पुरुषा’वर प्रेम, लग्न आणि पालकांचा विरोध; शबाना आझमी सांगतात तरुण वयातलं अवघड वळण..

शबाना आझमी सांगतात, लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देत बसले असते तर चर्चा वाढल्या असत्या, काळाबरोबर लोकांना योग्य ते कळत गेले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 05:14 PM2021-10-02T17:14:19+5:302021-10-02T17:28:11+5:30

शबाना आझमी सांगतात, लोकांच्या प्रश्नाला उत्तरे देत बसले असते तर चर्चा वाढल्या असत्या, काळाबरोबर लोकांना योग्य ते कळत गेले....

Love, marriage and parental opposition to ‘married men’; Shabana Azmi tells the difficult turn of a young age .. | ‘विवाहित पुरुषा’वर प्रेम, लग्न आणि पालकांचा विरोध; शबाना आझमी सांगतात तरुण वयातलं अवघड वळण..

‘विवाहित पुरुषा’वर प्रेम, लग्न आणि पालकांचा विरोध; शबाना आझमी सांगतात तरुण वयातलं अवघड वळण..

Highlightsआपल्या लग्नाबाबत एक महत्त्वाचा खुलासा शबाना आझमी यांनी नुकताच केलाशबाना आझमी यांच्यासाठीही ही परिस्थिती त्यांची परीक्षा पाहणारी होतीयोग्य वेळ येईल तेव्हा लोकांना जे योग्य आहे ते समजेल अशी भूमिका मी तेव्हा घेतली

शबाना आझमी आणि जावेद अख्तर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखली जाते. १९८४ मध्ये लग्नगाठ बांधल्यावर या दोघांनी इतके वर्ष एकमेकांची साथ दिली आहे. इतके मोठे कलाकार म्हटल्यावर त्यांच्या आयुष्यात अडचणी नसतील किंवा त्यांचे सगळे सुरळीत होत असेल असे आपल्याला वाटू शकते, पण प्रत्यक्षात तसे नाही. आपल्या लग्नाबाबत एक महत्त्वाचा खुलासा शबाना आझमी यांनी नुकताच केला आहे. ट्विक इंडिया या युट्यूबवर चॅनेलवर घेण्यात आलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ट्विंकल खन्नासोबत बोलताना ही बाब सांगितली. आपले आईवडिल जावेद अख्तर यांच्याबरोबर आपले लग्न करण्यासाठी तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. याचे कारण म्हणजे जावेद यांचे हनी इराणींसोबत लग्न झालेले होते आणि त्यांना फरान आणि जोया ही दोन मुलेही होती.

लोकमत
लोकमत

एखाद्या सामान्य महिलेसाठी ही अवस्था ज्याप्रमाणे कठीण होत असेल तशीच शबाना आझमी यांच्यासाठीही ही परिस्थिती त्यांची परीक्षा पाहणारी होती. या काळात लोक आमच्याबद्दल खूप चर्चा करत होते, त्यामुळे परिस्थिती आणखी अवघड होत असल्याचेही शबाना यांनी सांगितले. तुम्ही स्वत:ला स्त्रीवादी समजता मग ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळली? या प्रश्नावर शबाना आझमी म्हणाल्या, मी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत होते, माझ्या लग्नाच्या निर्णयाबाबत खुलासा करु शकत होते. पण त्यामुळे लोकांना चर्चेला आणखी वाव मिळाला असता आणि आमच्याबद्दल आणखी गॉसिप झालं असतं. त्यामुळे त्यावेळी मी मौन बाळगणे पसंत केले, योग्य वेळ येईल तेव्हा लोकांना जे योग्य आहे ते समजेल अशी भूमिका मी तेव्हा घेतली आणि ती योग्य ठरली.

लोकमत
लोकमत

 हनी या जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीविषयीही शबाना यांनी आदरपूर्वक काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. आपल्या मुलांना हनी यांनी माझ्याविरुद्ध कधीही भडकावले नाही, उलट त्यांनी मुलांना माझ्यासोबत लंडनला पाठवले असेही त्या म्हणाल्या. यामुळे माझ्यात आणि मुलांमध्ये सुदृढ नाते निर्माण व्हायला मदत झाल्याचे शबाना यांनी सांगितले.

Web Title: Love, marriage and parental opposition to ‘married men’; Shabana Azmi tells the difficult turn of a young age ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.