आजकाल लठ्ठपणाची समस्या उद्भवणं खूप सामान्य आहे. लठ्ठपणामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. रोजच्या खाण्यापिण्याच्या, जीवनशैलीच्या सवयी लठ्ठपणाला जबाबदार असतात. एकदा वजन वाढलं की माणसाला कोणत्याही अवयवाचा त्रास जाणवतो शकतो. (Low Sperm Count Reason ) त्याचप्रमाणे वजन वाढल्यानंतर लैगिंक आरोग्यावरही परिणाम होतो. वजन जास्त वाढल्यानं स्पर्म काऊंट कमी होतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार वजन कमी केल्यानं पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट डबल होऊ शकतो. डेनमार्कच्या वैज्ञानिकांनी एका अभ्यासात ५६ पुरुषांना सहभागी करून घेतले. (Losing weight help fat men double their sperm count)
या अभ्यासात सहभागी असलेल्या सगळ्यांनाच ८ आठवड्यापर्यंत ८०० कॅलरी घेण्यास सांगण्यात आले. सुरूवातीला ज्या पुरुषांचा बीएमआय ३२ होता. या दरम्यान वजन १६.५ किलोपर्यंत कमी झाले. यावेळी सगळ्या पुरुषांच्या स्पर्म काऊंटमध्ये ४१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ज्या लोकाचं वजन कमी झालं होतं आणि त्यांनी आपलं वजन मेटेंन ठेवलं त्यांच्यात स्पर्म काऊंट दुप्पट झाल्याचं दिसून आलं.
तुम्ही प्रेमात आहात की पाकिटात? पॉकेट रिलेशनशिपचा नवा ट्रेण्ड, तू कोण आणि मी कोण?
कोपहेगन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्ट्सना दिसून आलं की ज्या लोकांमध्ये बेली फॅट जास्त आहे. त्यांची सीमेन क्वालिटी फारशी चांगली नव्हती. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट १७ वर्षांपासून चे ४० वर्षांपर्यंत व्यवस्थित असतो नंतर स्पर्म काऊंट कमी व्हायला सरूवात होते. प्रति मिलिलीटर सिमेनमध्ये १५ मिलियन स्पर्म्स असणं नॉर्मल स्पर्म काऊंट मानला जातो. वाढत्या वयात पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट कमी होत जातो. तज्ज्ञ यामागे लठ्ठपणा, खराब आहार, प्रदूषण जबाबदार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
स्पर्म काऊंट कमी असल्यामुळे आजकाल विवाहीत लोकांना मुलं होण्यास समस्या येत आहेत. लठ्ठपणामुळे टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी होते ज्यामुळे स्पर्म उत्पादन कमी होतं. तज्ज्ञांना आढळलं की लठ्ठ लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत स्पर्म काऊंट खूपच कमी होता.