Lokmat Sakhi >Relationship > Effects of Extra Marital Affair : आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं साहजिक असलं तरी लक्षात घ्या विवाहित पुरुषाला डेट करण्यातले धोके

Effects of Extra Marital Affair : आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं साहजिक असलं तरी लक्षात घ्या विवाहित पुरुषाला डेट करण्यातले धोके

Major Effects of Extra Marital Affairs : कुणी कुणाला फसवत नसेलही पण आपल्या नात्याला काहीही भवितव्य नाही हे कळण्याइतपत शहाणपण वेळीच आलं नाही तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:58 PM2022-03-21T17:58:23+5:302022-03-21T18:20:46+5:30

Major Effects of Extra Marital Affairs : कुणी कुणाला फसवत नसेलही पण आपल्या नात्याला काहीही भवितव्य नाही हे कळण्याइतपत शहाणपण वेळीच आलं नाही तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते.

Major Effects of Extra Marital Affairs : Dangers of dating a married man | Effects of Extra Marital Affair : आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं साहजिक असलं तरी लक्षात घ्या विवाहित पुरुषाला डेट करण्यातले धोके

Effects of Extra Marital Affair : आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं साहजिक असलं तरी लक्षात घ्या विवाहित पुरुषाला डेट करण्यातले धोके

ऑफिसात, फ्रेण्ड सर्कलमध्ये कुणी तरी ओळखीचं होतं, आवडतं.ओढ वाटते. आणि प्रेमही. (Relationship Tips) पण नंतर कळतं की आपण ज्याच्या प्रेमात आहोत ती व्यक्ती आधीपासूनच विवाहित आहे. अनेकदा ते कळूनही, प्रेम-भूलथापा, शारीरिक संबंध यासाऱ्यापोटी ते नातं तसंच रेटलं जातं. (Major Effects of Extra Marital Affairs) खोटी वचनं खरी वाटू लागतात. कुणी कुणाला फसवत नसेलही पण आपल्या नात्याला काहीही भवितव्य नाही हे कळण्याइतपत शहाणपण वेळीच आलं नाही तर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. (Dangers of dating a married man)

गेहराईयां सिनेमा पाहिलाच असेल, त्यात जरी लग्न झालेलं नसलं तरी एका एगेंज असलेल्या माणसाला डेट करणं, त्याच्याशी संबंध पुढे त्या सिनेमातल्या आलिशाला किती महागात पडतं. ओखलाम स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासाचा एक अहवाल न्यू सायंटिस्ट या पोर्टलने प्रसिध्द केला होता. त्यांच्या मते, मॅच्युअर्ड, रोमान्स कसा करायचा हे माहिती असलेल्या पुरुषाकडे आकर्षित होणाऱ्या तरुण मुलींचे प्रमाण कायमच जास्त असते.

रुबाबदार, कमावते, ज्याच्यावर अन्य बायका भाळतात असे पुरुषही अनेकींना जास्त ॲट्रॅक्टिव्ह आणि पॉवरफूल वाटतात. मात्र हा क्षणाचा चकवा गोत्यात असू शकतो. त्यामुळे आयुष्यभराची कमिटमेण्ट, नात्याला अधिकृत नाव आणि प्रतिष्ठा हवी असेल तर विवाहित पुरुषाला डेट करणं टाळणंच योग्य.



नात्याला काही ‘नाव’च नाही? म्हणून टाळा हा चकवा..

१. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे भेटू शकणार नाही

वैवाहिक व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करताना तुम्हाला नेहमी निर्बंधांचा सामना करावा लागेल. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला कॉल करू शकत नाही किंवा मेसेज करू शकत नाही. कारण तुम्हाला त्याची पत्नी किंवा इतर कोणासमोरही पकडले जाण्याची भीती असते. तुम्ही दोघे सार्वजनिक ठिकाणी भेटू शकत नाही. जगाच्या नजरेपासून लपून तुम्हा दोघांना भेटावे लागेल. हे महागात पडू शकते. अनेकदा पार्टनरचा विचार करून तुमचा फोन, मेसेज दुर्लक्षित केला जाऊ शकतो. याच कारणांमुळे राग, चिडचिड होते.

..म्हणून ऐन तरूण्यात पुरूषांना येतं वंध्यत्व; स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी काय खायचं काय टाळायचं, वाचा

२. खोटं बोलणं

जेव्हा तुम्ही एखाद्या विवाहित पुरुषाला डेट करता तेव्हा तुम्हाला नातेसंबंधाच्या प्रत्येक टप्प्यावर खोटे बोलावे लागेल. तुम्ही तुमचे प्रेमसंबंध तुमच्या मित्रांपासून, कुटुंबापासून लपवण्यासाठी खोटे बोलता. आपण दुसऱ्याचा संसार मोडतो असं वाटून सतत अपराधी वाटते.



३. घर तोडणारी/तोडणारा असा टॅग

विवाहित पुरुष कितीही दोषी असला तरी लोक तुम्हाला नेहमी घर तोडणारी असं लोक म्हणतील. त्याचे वैवाहिक जीवन फारसं बरं नाही हे त्याने तुम्हाला सांगितले असले तरी, लोक असं मानतील की तुमच्या येण्यानं जोडप्यामध्ये फूट पडली आहे.

४. तुम्ही त्याची प्रायोरिटी कधीच नसाल

एखाद्या विवाहित मुलाशी नातेसंबंधात, आपल्याला नेहमीच कमीपणा वाटेल. ती व्यक्ती नेहमीच त्याच्या पत्नीला आणि घरच्यांना प्रायोरिटी देईल. त्याचे तुमच्यावर खूप प्रेम आहे असं वारंवार सांगितलं तरी त्यावर किती विश्वास ठेवायचा, याचा विचार करा.

उन्हाळ्यात रोजच्या जेवणातील ४ पदार्थांमुळे होऊ शकतं फूड पॉयझनिंग, सावधान..

५. लोक तुमच्याबद्दल गॉसिप करतील

लोक गॉसिप करतील, अनेक जवळची माणसं दुखावतील, कायमची दूर जातील. मित्रमैत्रिणीही साथ देणार नाहीत. मुख्य म्हणजे सतत आपल्याविषयी असे गॉसिप होणे तुम्हाला चालणार आहे का? याचा विचार करा.

Web Title: Major Effects of Extra Marital Affairs : Dangers of dating a married man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.