Lokmat Sakhi >Relationship > घटस्फोट- ब्रेकअप यानंतर बायकांना आनंदानं जगण्याचा अधिकारच नाही का? - मलायका अरोराचा थेट सवाल

घटस्फोट- ब्रेकअप यानंतर बायकांना आनंदानं जगण्याचा अधिकारच नाही का? - मलायका अरोराचा थेट सवाल

मलायका अरोरा, ती घटस्फोटानंतर आनंदानं जगतेय. वयानं लहान आहे तिचा नवा जोडीदार, ती थेटच म्हणते की पुरुषांना एक न्याय, बायकांना एक न्याय असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 06:39 PM2022-04-22T18:39:18+5:302022-04-22T18:42:30+5:30

मलायका अरोरा, ती घटस्फोटानंतर आनंदानं जगतेय. वयानं लहान आहे तिचा नवा जोडीदार, ती थेटच म्हणते की पुरुषांना एक न्याय, बायकांना एक न्याय असं का?

Malaika Arora says women should have a-life after divorce, breakup. | घटस्फोट- ब्रेकअप यानंतर बायकांना आनंदानं जगण्याचा अधिकारच नाही का? - मलायका अरोराचा थेट सवाल

घटस्फोट- ब्रेकअप यानंतर बायकांना आनंदानं जगण्याचा अधिकारच नाही का? - मलायका अरोराचा थेट सवाल

Highlightsवयानं लहान जोडीदार निवडला तर मोठा गहजब होतो.

मलायका अरोरा कायम चर्चेत असते. ट्रोल होते. आपल्यापेक्षा वयानं दहा वर्षे लहान असलेल्या अर्जून कपूरशी तिचं प्रेमप्रकरण. तिनं घटस्फोटानंतर लगेच जोडीदार शोधणं, आनंदी आणि फॅशनेबल राहणं हे सारं अनेकांच्या डोळ्यात येतं. मलायका स्वत:ही हेच सांगतेय की, घटस्फोट किंवा ब्रेकअपनंतर बायकांना आनंदी राहण्याचा अधिकारच नाही का? त्यांनी आपलं आयुष्य नव्यानं सुरुच करायचं नाही का? पुरुषसत्ताक व्यवस्था बाईला एक न्याय, पुरुषांना एक न्याय असं कुठवर करणार? हा भेदाभेद कशासाठी?

(Image : Google)

हॅलो मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मलायका स्त्री-पुरुष नातेसंबंध, भेदभाव, बायकांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी, आपल्यापेक्षा वयानं लहान असलेला जोडीदार जर बाईने निवडला तर त्यासंदर्भात होणारी हेटाळणी याविषयी मोकळेपणानं आणि स्पष्ट बोलली आहे.
मलायका म्हणते, ‘आपल्या समाजात डबल स्टँडर्डच दिसतात. ते महिलांसाठी वेगळे, पुरुषांसाठी वेगळे आहे. घटस्फोटानंतर किंवा ब्रेकअपनंतरही बाईच्या वाट्याला आनंदी, समाधानी आयुष्य यावं. तिनं तसं आयुष्य स्वत:साठी घडवावं हेच मान्य होत नाही. अतिशय स्त्रीद्वेष्टेपणा दिसतो. त्यातही वयानं लहान जोडीदार निवडला तर मोठा गहजब होतो. ’
मलायका म्हणते, ‘मी म्हणजे स्ट्राँग वूमन इन अ प्रोगेस. मी रोज स्ट्राँग होतेय, फिट होतेय आणि आनंदीही होते आहे. मी माझ्या आईचं प्रतिबिंब आहे. तिची जगण्याची जिद्द, हिंमत हे सारं वाखाण्यासारखं आहे. मी तिच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करते आहे. ती नेहमी सांगायची, स्वतंत्र होते. आणि स्वत:च्या अटीशर्थींवर मनासारखं जगायला शिक.’

(Image : Google)

२०१७ साली तिनं १८ वर्षांचा संसार मोडून वेगळं व्हायचं ठरवलं. आता तिचा मुलगा १९ वर्षांचा आहे. घटस्फोटानंतर ती ही मोडूनच पडली होती असं तिनं आजवर वारंवार मुलाखतीत सांगितलं आहे. मात्र तिचं नवीन नातं, नवा जोडीदार, स्वत:च्या फिटनेससह, करिअरकडे लक्ष या साऱ्याची घडी तिनं बसवली.
मूव्ह ऑन करा असं म्हणणं सोपं, ते तिनं करुन दाखवलं आहे.
 

Web Title: Malaika Arora says women should have a-life after divorce, breakup.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.