Join us  

वजन वाढले म्हणून बायकोला टोमणे मारता? रिसर्चचा दावा, वजनदार स्त्रियांचे जोडीदार जास्त आनंदी असतात कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:47 PM

फिट, मेटेंन राहणं कोणाला नाही आवडत. आजकाल वजन वाढ ही खूपच कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी जीमपासून ...

फिट, मेटेंन राहणं कोणाला नाही आवडत. आजकाल वजन वाढ ही खूपच कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी जीमपासून डाएटपर्यंत काहीही करण्याची मुलींची तयारी असते. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार वजनदार मुलींच्या प्रेमात असलेले किंवा जास्त वजन असलेल्या मुलींच्या प्रेमात असलेली मुलं जास्त खूश असतात. (Man who fall in love with curvy girl fat chubby girl more happy that other reaserch say)

नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मॅक्सिकोच्या एका अभ्यासानुसार कर्वी प्लस साईज महिलांचे जोडीदार सडपातळ मुलींच्या तुलनेत १० पटीनं जास्त खुश असतात. UNAM मधील मानसशास्त्र विभागाच्या नवीन अभ्यासात, डॉ. फिलेमोन अल्वाराडो आणि डॉ. एडगार्डो मोरालेस यांनी नमूद केले की जे पुरुष गुटगुटीत स्त्रियांशी संबंध ठेवतात ते इतरांच्या तुलनेत दहापट जास्त आनंदी असतात.

सामान्यत: असं समजलं जातं की पुरूषांना सडपातळ, उंच आणि फिटमुली आवडतात पण रिसर्चमध्ये समोर आलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. यानुसार जी मुलं लठ्ठ मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असतात ते इतरांच्या तुलनेत जास्त खूश असतात. हा रिसर्च नॅशनल ऑटोनॉमस यूनिवर्सिटी ऑफ मॅक्सिकोमध्ये करण्यात आला होता. ज्यात लठ्ठ मुलींच्या प्रेमात पडणरे किंवा लग्न करणारे पुरूष जास्त खूश असल्याचं दिसून आलं. रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना  ज्यांचे पार्टनर जीमला जाण्यासाठी फोर्स करत नव्हते. 

कारण ज्या महिला वजन कमी करण्यावर लक्ष देत नाहीत त्यांची वागणूक सकारात्मक असते. त्या समर्थपणे आपलं म्हणणं मांडतात. अभ्यासानुसार, पुरुष  हेल्दी  पार्टनरसह अधिक हसतात आणि त्यांच्यात समस्या सुलभपणे सोडवण्याची अधिक शक्यता असते

टॅग्स :रिलेशनशिप