रिलेशनशिपमध्ये अनेक घटक महत्वाचे असतात. जसे की पार्टनरला समजून घेणे, दोघांतलं प्रेम आणि विश्वास आणि त्यासोबतच लैंगिक सुखाचं नातं. लग्नानंतर अनेकदा व्यावहारिक गोष्टी, जागेचा अभाव, प्रायव्हसीचे प्रश्न यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही. लैंगिक संबंधांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नात्यातला ताणही वाढतो. सेक्सचे प्रमाण कमी म्हणजे आपल्यात किंवा नात्यातच काही त्रुटी आहेत असं समजून अनेकजण तणावग्रस्त होतात. शोधतात की कितीवेळा संबंध आले तर ते नॉर्मल. प्रत्यक्षात तसं काही नसतं.
लैंगिक विकार तज्ज्ञ डॉक्टर राजन भोसले सांगतात, ''हेल्दी सेक्स लाईफमध्ये कितीवेळा संबंध आले यापेक्षा नात्यात प्रेम किती, वय किती आणि परस्परांना त्यातून मिळणारा आनंद किती हेच जास्त महत्त्वाचं आहे. दोघांचा सहभाग आणि आनंद महत्त्वाचा.’
डॉ. भोसले सांगतात, जर एखाद्या कपलचं विशीत लव्ह मॅरेज झालं असेल, तर त्यांची सेक्स लाईफ उत्तम असू शकते. ते आठवड्यातून ३ ते ४ वेळा देखील संबंध ठेवत असतील. मात्र, जर एखाद्या अरेंज मॅरेज कपलच्या लग्नाला १५ ते २० वर्ष पूर्ण झाले असतील तर, ते आठवड्यातून १ ते २ दिवस संबंध ठेवत असतील, ते देखील या गोष्टीपासून समाधानी असतात. सगळ्यांचीच सेक्स लाईफ सारखीच असेल असे नाही. रिलेशनशिपचा कालावधी, शारीरिक आकर्षण यासह पार्टनरचा सेक्समध्ये असलेला सहभाग महत्वाचा आहे.
आठवड्यातून ५ ते ६ वेळा संबंध ठेवणे, यासह आठवड्याच्या ६ दिवसातून एकदा संबंध ठेवणे हे असूच शकते.
एखाद्या जोडप्याचं लग्न जर चाळीशीत झालं असेल तर, त्यांची सेक्स लाईफ विशीतल्या जोडप्यासारखीही असू शकते. आपल्या पार्टनरप्रती असलेलं आकर्षण, प्रेम आणि फिजिकल रिलेशनशिपमध्ये असलेला सहभाग ही वेगळी गोष्ट आहे. वय, सहवास, प्रेम, मनस्थिती याप्रमाणे हे नातं बदलतं. मात्र नात्यात काही ताण. लैंगिक प्रश्न असतील, आनंद नसेल तर योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.’