Join us  

Masturbation Affects The Fertility : हस्तमैथून केल्यानं स्पर्म काऊण्ट कमी होतो, पुरुषांची फर्टिलिटी कमी होते, हे खरं आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 7:18 PM

Masturbation Affects The Fertility : तज्ज्ञ सांगतात, आपली जीवनशैली, ताणतणाव यातून पुरुषांच्या फर्टिलिटीचे प्रश्न वाढले आहेत, गैरसमज टाळून योग्य सल्ला घ्या.

हस्तमैथुनाविषयीच अनेकांच्या मनात बरेच गैरसमज असतात. इतके की अनेकजण विवाहानंतरही आपल्या लैंगिक सुखातल्या (Sexual Health) कल्पना हस्तमैथूनाशी जोडतात. (Masturbation Affects The Fertility) त्याविषयी गैरसमज इतके की संतती व्हायला वेळ लागला किंवा त्यात काही अडचणी आल्या तरी आपला स्पर्म काऊण्ट हस्तमैथून केल्यानंच कमी झाला असा अनेक पुरुषांचा समज असतो. आणि त्यासंदर्भात ते जोडीदाराशी बोलतही नाहीत आणि चुकीचे उपचार आणि विचारही करतात. (Masturbation affect sperm count or not know sexologist opinion)

हस्तमैथुनामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते का? शुक्राणूंच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. त्यात वॉट्सपिय सल्ले, युट्यूबवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर सेक्शुअल आरोग्याबद्दल अर्धवट माहिती अनेकांना मिळते. त्यातून वैवाहिक जीवन, नातेसंबंध आणि संततीसंदर्भात काही समस्या असतील तर त्यामुळेही स्ट्रेस वाढतो.

हस्तमैथुन आणि शुक्राणूंबाबत लैंगिक विकार तज्ज्ञ डॉ. अर्जुन यांनी  मेन्स एक्सपीला दिलेल्या माहितीनुसार वीर्याची कमतरता, पुरुषाचे जननेंद्रिय पातळ होणे किंवा आकुंचन होणे हे अनेकदा हस्तमैथुनाशी संबंधित असते. असेच प्रश्न घेऊन अनेक रुग्ण आमच्याकडे येतात. पण स्पर्म काऊण्ट त्यामुळेच कमी झाला असा प्रश्न घेऊन अनेकजण येतात, तेव्हा त्यासंदर्भातले गैरसमज दूर करायला हवेत.

शुक्राणूंच्या कमतरतेची कारणं

अंडाशय (Testicle) अधिक गरम असणं

लठ्ठपणा

औषधांचे अतिसेवन

लैंगिक आजार

ताण तणाव

डॉ अर्जुन स्पष्टपणे सांगतात - हस्तमैथुनामुळे ना वीर्य कमी होते ना स्पर्म काऊण्ट कमी होतो. हा भ्रम मनातून काढून टाका. कारण पुरुषाच्या शरीरात दररोज वीर्य निर्माण होत असते. वीर्याची कमतरता दूर करण्यासाठी कोणी हस्तमैथुन करणं सोडले तरीही त्याच्या शरीरात शुक्राणूंची कमतरता असू शकते. प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेनुसार वीर्य दररोज तयार होते. ते त्या ग्रंथीमध्ये भरले की बाहेरही येते. उदाहरणार्थ, जर अनेकांनी हस्तमैथुन केले नाही तर त्यांच्या लघवीद्वारे किंवा रात्रीच्या वेळी आपोआप वीर्य बाहेर पडते. त्यामुळे हस्तमैथुनामुळे वीर्य कमी होण्याचा थेट संबंध नाही.

वीर्याच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो?

जास्त प्रमाणात वीर्य बाहेर पडणे देखील हानिकारक आहे. वीर्य पातळ झाल्यामुळे, वीर्यस्खलन दरम्यान कामोत्तेजना कमी होऊ शकते.

 गर्लफ्रेंड किंवा बायकोपासून पुरुष कायम लपवतात 5 गोष्टी; हे सिक्रेट नक्की असतं तरी काय?

वीर्याची गुणवत्ता कशी वाढवायची?

डॉ. अर्जुन सांगतात आठवड्यातून फक्त दोनदा हस्तमैथुन करा.  याशिवाय स्पर्म क्वालिटी औषधाशिवायही वाढवता येते. मात्र जीवनशैली बदला.

१. दररोज ताज्या भाज्या आणि फळे खा, व्यायाम आणि योगासनांची सवय लावा

२. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चाला

३. अश्वगंधा, शतावरीसारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

४. धूम्रपान करू नका किंवा दारू पिऊ नका

५. ओव्हर-द-काउंटर औषधांपासून दूर रहा

६. तुमचे वजन वाढू देऊ नका

टॅग्स :लैंगिक जीवनलैंगिक आरोग्यरिलेशनशिप