Join us  

‘बराक ओबामा माझ्यासाठी...’ मिशेल ओबामांची हृदयस्पर्शी पोस्ट; त्या सांगतात, लग्नाचं नातं हवं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 9:50 AM

Michelle Obama Wife of Barack Obama Relationship Post : लग्न म्हणजे तुम्ही स्वत:ला मतभेद आणि अस्वस्थता यासाठी तयार ठेवायला हवे.

ठळक मुद्देलग्न झाल्यावर दिवसरात्र एकमेकांसोबत राहावे लागत असल्याने आपण अडचणी टाळू शकत नाही.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांचे नाते कसे आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. नुकतेच मिशेल ओबामा यांनी बराक यांच्यासोबतचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून यामध्ये त्यांनी रिलेशनशिपबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत. बराक ओबामा आणि त्यांच्या नात्याविषयीही त्यांनी काही वक्तव्य केले असून त्यांची ही पोस्ट नात्याविषयी त्यांना काय वाटते हे सांगणारी एक अतिशय महत्त्वाची पोस्ट असल्याचे दिसते. त्या म्हणतात, मी बरेच ठिकाणी राहीली आहे, पण माझं खरं घर ही माझी फॅमिली आणि बराक ओबामा आहेत (Michelle Obama Wife of Barack Obama Relationship Post). 

(Image : Google)

त्या दोघांच्या नात्याविषयी सांगताना त्या म्हणतात, आमचं लग्न कधीच ५०-५० मध्ये राहिलेली नाही. आमच्यातील एकाला जास्त काहीतरी हवं असतं किंवा एक जण जास्त देतो. आपल्याला एकमेकांचे म्हणणे ऐकावे लागेल, तरच आपण एकत्र पुढे जाऊ शकतो. अनेकदा तरुण मुलं मला लग्नाविषयी विचारतात, तेव्हा मी त्यांना एवढंच सांगते. की लग्न म्हणजे तुम्ही स्वत:ला मतभेद आणि अस्वस्थता यासाठी तयार ठेवायला हवे. तडजोड कशी करायची हे तुम्हाला शिकायला लागते. या पोस्टसोबत मिशेल यांनी त्यांचे ओबामांसोबतचे काही खास फोटोही शेअर केले आहेत. 

नातेसंबंधात असणाऱ्यांनाही त्या काही महत्त्वाच्या टिप्स देतात, मिशेल म्हणतात, डेटींग करत असताना आपण नात्याला ग्लॅमराईज करतो, पण लग्न झाल्यावर दिवसरात्र एकमेकांसोबत राहावे लागत असल्याने आपण अडचणी टाळू शकत नाही. तेव्हा तुम्ही स्वत:ला काही प्रश्न विचारायला हवेत. या नात्यातून तुम्हाला काय हवे आहे? तुम्हाला लग्न हवे आहे की आजीवन भागीदार हवा आहे. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आज आपण कोण आहोत आणि भविष्यात आपल्याला कोण व्हायचे आहे. आता तुम्ही मला उत्तर द्या आणि लग्न किंवा नातेसंबंधांबाबत तुम्ही काय सल्ला द्याल तेही सांगा असे मिशेल आपल्या पोस्टच्या शेवटी आपल्या फॉलोअर्सना विचारतात.   

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप