मिस अर्जेंटीना मारियाना वरेला (Miss Argentina Mariana Varela) आणि मिस प्यूर्टो फॅबियोला व्हॅलेंटाईननं (Miss Puerto Rico Fabiola Valentín) लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी सोशल मीडियावर या नात्याची अधिकृत घोषणा करून लग्न केलं. या नवविवाहित जोडप्यानं दीर्घकाळ आपलं नातं गुप्त ठेवल्यानंतर अखेर सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली. दोघांनी आपापल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या काही भावनिक क्षणांची झलक आहे.
28 ऑक्टोबरला दोघांचे लग्न झाले होते. या व्हिडिओमध्ये, मारियाना वरेला आणि फॅबिओला व्हॅलेंटाइन एकत्र वेळ घालवताना आणि त्यांच्या भव्य लग्नाच्या प्रस्तावाची झलक शेअर करताना दिसत आहेत. (Miss puerto rico and miss argentina mariana varela are a couple and now married after keeping relationship secret)
व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले, "आमचे नाते खाजगी ठेवण्याचे निवडल्यानंतर, आम्ही एका खास दिवसासाठी आमचे दरवाजे उघडतो. 28/10/22." वरेला आणि व्हॅलेंटाईन मिस ग्रँड इंटरनॅशनल 2020 सौंदर्य स्पर्धेत भेटले आणि स्पर्धेच्या शेवटपर्यंत त्यांची मैत्री चांगली राहिली. वरेलाने मिस युनिव्हर्स 2019 मध्ये अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले आणि मिस ग्रँड इंटरनॅशनल 2020 मध्ये टॉप 10 पोझिशन्स देखील भूषवले. या जोडप्याने अनेक मॉडेलिंग एजन्सीमध्येही काम केले आहे.
केस खूप गळतात, वाढ थांबली? फक्त १० रुपयांत घरीच शॅम्पू बनवा, राखा केसांची निगा
या दोन सुंदरींच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लग्नावर आतापर्यंत लाखो लोकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दोघांनी आपल्या नात्याची माहिती देताच, मिस ग्रँड इंटरनॅशनलच्या अधिकृत अकाऊंटवर फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.