नात्यात विश्वासासोबतच सत्य हेही खूप महत्त्वाचे असते. कारण अनेक वेळा पार्टनर खोटं बोल्ल्याचं नंतर कळल्यानं अनेक नाती तुटतात. अनेक वेळा पुरुष जोडीदार पत्नी किंवा गर्लफ्रेंडला प्रभावित करण्यासाठी किंवा तिला राग येऊ नये म्हणू खोटे बोलतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पुरूष पार्टनर आपल्या गर्लफ्रेंडपासून लपवतात किंवा खोटं सांगतात याबाबत या लेखात सांगणार आहोत. (Most men never tell the truth about these 5 things to their girlfriend or wife)
सिंगल आहे
अनेक वेळा विवाहीत पुरुष अविवाहीत स्त्रीकडे आकर्षित होतात आणि मैत्री केली जाते. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बाबतीत खोटं सांगितलं जातं की मी सिंगल आहे. अनेक विवाहित पुरुष हे खोटे बोलतात. जेणेकरून आवडत्या मैत्रिणींनी त्यांच्याशी बोलणे बंद करू नये. (Most common lies male partner says to her partner)
स्मोकिंग
अनेकदा पुरुष त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंडशी त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीबद्दल खोटे बोलतात. कारण महिला अनेकदा त्यांना धूम्रपान करण्यास नकार देतात. अशा स्थितीत ते खोटे बोलतात आणि स्मोकिंग करतात.
मी तुझाच विचार करत होतो
अनेकदा असे दिसून येते की पुरुष मित्रांसोबत एन्जॉय करतात आणि त्यांना त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला हे आवडत नाही. त्यामुळे बायकोच्या किंवा मैत्रिणीच्या नाराजीला सामोरे जावे लागत नाही, म्हणून आता मी फक्त तुझ्याबद्दलच विचार करत होतो किंवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. असं पार्टनरला बरं वाटावं म्हणून सांगतात.
पैश्यांच्या बाबततीत खोटं
बहुतेक पुरुष त्यांच्या मैत्रिणीशी किंवा पत्नीशी खोटे बोलतात की त्यांच्याकडे खूप पैसा आणि मालमत्ता आहे. पैश्यांच्या कमतरतेबाबत ते कधीच आपल्या गर्लफ्रेंडला सांगत नाहीत.
रिलेशनशिपबद्दल खोटं
जेव्हा जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये येतो तेव्हा तो कधीही सांगत नाही की तुमच्या आधी त्याच्या किती गर्लफ्रेंड्स होत्या. काही पुरुष नेहमी म्हणतात की तू पहिली मुलगी आहेस जिच्या मी प्रेमात पडलो. जोडीदाराला कोणत्याही असुरक्षिततेच्या भावनेपासून वाचवण्यासाठी ते अशा प्रकारचं खोटं बोलतात.