हस्तमैथुनाबद्दल अनेक गैरसमज पुरूषांच्या मनात असतात. (Sexual Health Tips) महिलांना यासंदर्भात माहिती नसते किंवा जाणून घ्यायची इच्छा नसते. मात्र जोडीदारच नाही तर घरात वयात येणारा मुलगा असेल तर त्याच्या शारीरिक आणि लैंगिक सुखाच्या कल्पना, शास्त्रीय माहिती आणि अज्ञान यासंदर्भात मोकळेपणानं चर्चा -संवाद होणं अपेक्षित आहे. (What are the side effects of excessive masturbation)
वयात येणाऱ्या मुलांना योग्य माहिती न दिल्यानं ते चुकीच्या पद्धतीनं माहिती मिळवतात त्याचा त्यांच्या शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. (Side Effect of Masturbation) हस्तमैथुन करण्याविषयीही अनेक गैरसमज आहेत. ते केल्यानं पुरुषांचं शरीर कमकुवत होतं, वजन वाढत नाही, उंची वाढत नाही असे बरेच गैरसमज प्रचलित आहेत. मात्र अलिकडेच नोएडा येथील द रेनोवा केअर सेंटरने यासंदर्भात अधिकृत शास्त्रीय माहिती प्रसिध्द केली आहे. (Health impacts of masturbating a lot)
हस्तमैथुन आणि तरुण मुलांची भीती
अनेकांना असे वाटते की हस्तमैथुनामुळे पुरुषांच्या शरीरात अशक्तपणा येतो अति हस्तमैथुनामुळे शारीरिक विकासात अडथळा, वजन वाढणं, उंची कमी होणं या समस्या निर्माण होतात. द रेनोवा केअर सेंटर, नोएडाच्या वैद्यकीय पथकातील तज्ज्ञ सांगतात, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. लोकांना असे वाटते की हस्तमैथुनासाठी वीर्य निर्मितीमध्ये भरपूर ऊर्जा नष्ट होते, परंतु तसे नाही. शरीरात मर्यादित ऊर्जा असते आणि ती वीर्यनिर्मितीदरम्यान खर्च होते. वीर्य निर्मिती आणि शारीरिक दुर्बलता यांचा काही संबंध नाही. लैंगिक इच्छा नैसर्गिक आहे पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक. म्हणून, हस्तमैथुनाची वारंवारता वाढवण्याऐवजी तुम्ही तुमची ऊर्जा खेळ किंवा इतर कोणत्याही छंदांकडे वळवण्याचा विचार करू शकता.
हस्तमैथुनामुळे वजन कमी होतं?
व्यक्तीचे वय आणि इतर घटकांवर वजन अवलंबून असते. किशोरवयीन मुले अधिक हस्तमैथुनात गुंतली तर त्यांचे आरोग्य चांगले राहणार नाही. हस्तमैथुन आणि वजन वाढणे किंवा कमी होणे यांचा थेट संबंध नाही.
ताण कमी होतो?
हस्तमैथुन केल्याने अनेक हार्मोन्स बाहेर पडतात. हे हार्मोन्स आपल्या मेंदूवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. हस्तमैथुन केल्याने हॅप्पी हार्मोन्स डोपामाइन उत्सर्जित होते. याशिवाय हस्तमैथुनामुळे वेदना कमी करणारे एंडॉर्फिन देखील बाहेर पडतात. हा हार्मोन तणाव कमी करतो आणि मूड सुधारण्यास मदत करतो. यामुळेच हस्तमैथुनानंतर लोकांना आराम वाटतो. यामुळे चांगली झोप लागते आणि बीपी कमी होण्यास मदत होते.
अतीच केलं तर?
जर सतत त्याच क्रियेचा विचार केला तर तरुणांच्या मनावर वाईट परिणाम होतात. तुम्ही कामात लक्ष केंद्रित करू शकणार नाही. मानसशास्त्रज्ञ मानतात की हस्तमैथुनाचा सतत विचार करू नका, यामुळे तुमचे मन आनंदी राहणार नाही, ते कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करण्यासारखे आहे.
जोडीदार बरोबर असताना हस्तमैथुन करावे का?
१) जर जोडीदाराची सेक्स ड्राइव्ह तुमच्यापेक्षा कमी असेल तर हस्तमैथुन हा एक पर्याय आहे
२) जोडीदार आजारी असल्यास
३) जर जोडीदार गर्भवती असेल तर
४) जोडीदारसोबत नसल्यास