Join us  

"लग्न न करता मला मुलं हवी असतील तर...."; तब्बूला संताप अनावर झाला मग घडलं असं काही......

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 1:38 PM

Tabu said about marriage : अनेक कारणांमुळे एकटेपणानं आपलं आयुष्य काढत असलेल्या स्त्रियां तब्बूचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतात.

प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात एक चांगला जोडीदार असावा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवावेत असं वाटत असतं. पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलंय त्याच्याशी लग्न होणं किंवा त्याच्यासोबत आयुष्यभर राहणं सगळ्यांच्यात नशिबात नसतं. नात्यातील गुंता वाढत  गेल्यानं अनेकदा जवळची नाती तुटतात. तुम्ही अनेकदा अशी उदाहरणं पाहिली असतील जिथं कपल्सनी एकत्र पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. म्हणून काहीजण एकटं राहणं पसंत करतात.

कदाचित त्यांना आपल्या आवडती सोडून इतर कोणासोबत राहून नात्याची नवीन सुरूवात करण्याची इच्छा नसते. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध बॉडीवूड अभिनेत्री तब्बू.  वयाची ४५ वर्ष ओलांडल्यानंतर देखील तब्बूने लग्न करणं पसंत केलं नाही. अनेक कारणांमुळे एकटेपणानं आपलं आयुष्य काढत असलेल्या स्त्रियां तब्बूचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतात.

आतापर्यंत अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्यांसह तब्बूचं नाव जोडण्यात आलं पण तिनं कधीही नात्याचा स्विकार केला नाही. तिला वैयक्तीक आयुष्याबाबत विचारणा केल्यास ती अनेकांची बोलती बंद करते. फिल्म फेअरला दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूनं यााबाबत खुलासा केला आहे. 

लग्न कधी करणार याबाबत विचारणा करण्यात आली होती?

सगळ्यानाच वय झाल्यानंतर लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो. तब्बूलाही अनेकदा मुलाखतीत लग्नाबाबत विचारलं जातं. तिला लग्नाबाबत प्रश्न विचारला असता तिने म्हटलं होतं की, ''तुम्हाला माझ्या लग्नामध्ये इतका रस का आहे? माझी मानसिकता काय आहे याबाबत तुम्हाला स्पष्टीकरण का हवं असतं? दुसरा प्रश्न विचारा हा प्रश्न खूप बोअरिंग आहे. ''असं सांगत तिनं उत्तर देणं टाळलं.

तुम्हालाही आयुष्यात याचा फायदा होऊ शकतो?

सध्याचा काळ फार वेगळा आहे. मुलींच्या लग्नाबद्दलच्या संकल्पना बदलल्या आहेत. काही मुली लग्न न करताच एकटं राहणं पसंत करतात. त्यांना लग्न या गोष्टीमध्ये काहीच रस नसतो. पण नातेवाईक मात्र तुम्हाला वारंवार याबाबत विचारणा करतात. अशा लोकांना नेमकं काय उत्तर द्यायचं हे तुम्ही तब्बूकडून शिकू शकता. समोरच्या व्यक्तीला तुमच्या अशा उत्तरानं राग आला तर पुन्हा तुम्हाला तो असा प्रश्न विचारणार नाही. 

ज्या मुली लग्न करत नाहीत. त्यांचे नक्कीच बाहेर अफेअर असणार असं समजलं जातं.  असे प्रश्न विचारत असलेल्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही शांत बसण्याच्या पर्यायाची निवड करा. चुकूनही कोणासह तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल शेअर करू नका. कारण आपण चांगल्या मनानं समोरच्या व्यक्तीला सगळं सांगितल्यास वेळ आल्यावर ती व्यक्ती फायदा घेऊ शकते किंवा आपल्या भावनांचा अनादर करू शकते. 

मुलांबद्दल विचारल्यास तब्बूचे उत्तर?

लग्न आता केलं नाही तर मुलं होण्यास त्रास होईल. हेच योग्य वय आहे असं नातेवाईक वारंवार म्हणत असतात. तब्बूच्या बाबतीत देखील असंच घडलं होतं. यावर तिने इतरांना उत्तर देत सगळ्यांची बोलतीच बंद केली होती. ती म्हणाली, " प्रत्येक महिलेला आई होण्याचा अधिकार आहे. तिचं लग्नं झालेलं असूदे किंवा नसूदे. लग्नाआधी जर कोणाला आई व्हायचं असेल तर त्यांना कोणी अडवू शकत नाही." तब्बचे हे उत्तर ऐकून सगळेचजण गप्प बसले. एकटं जगत असताना जगाचा सामना कसा करायचा यासाठी तब्बू उत्तम उदाहरण आहे. 

टॅग्स :तब्बूरिलेशनशिपरिलेशनशिप