आयुष्यात लग्न म्हणजे महत्वाचा टप्पा. लग्न झाल्यानंतर दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ देतात. मात्र, एखाद्या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी, त्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला जीवनसाथी बनवण्यापूर्वी, त्याचा स्वभाव, त्याची आवड, आपल्या सुखात साथ देण्यासोबतच, तो दुख किंवा अडचणीचे क्षण कसे हाताळतो, या सगळ्या गोष्टी पाहूनच लग्न करावे.
डॉ. विकास दिव्यकिर्तीं, युपीएससीसह स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या जगात अत्यंत फेमस असलेले आणि सध्या १२ फेल सिनेमामुळे चर्चेत असणारे प्रोफेसर सांगतात, 'मुलींनी लग्न करण्यापूर्वी विशेषतः मुलांना एक प्रश्न विचारायला हवे. त्या प्रश्नाच्या उत्तरावरून आपल्याला, त्या मुलाचा स्वभाव ओळखण्यात मदत होऊ शकते'(One Question to Ask Your Partner Before Marriage).
डॉ. विकास दिव्यकिर्तीं कोण आहेत?
डॉ. विकास दिव्यकीर्ती, हे दृष्टी आयएएसचे संस्थापक आणि १९९६ च्या बॅचचे आयएएस आहेत. ते कोचिंग क्लासेसमध्ये शिकवतात. ते आपल्या शिकवणीतून फक्त पुस्तकी ज्ञान देत नसून, आयुष्यातील काही धडेही गिरवायला शिकवतात. १ वर्ष गृह मंत्रालयात काम केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज ते एक नामवंत शिक्षक, मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक आहेत.
आज फिर जिने की तमन्ना है! हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडद्यावरचं अव्वल नाव-वहिदा रहमान..
मुलींनी मुलाला लग्नापूर्वी विचारावा असा एक प्रश्न
डॉ. विकास दिव्यकीर्ती सांगतात, 'लग्नापूर्वी मुलीच्या घरच्यांकडून मुलाला अनेक प्रश्न विचारले जातात. मुलगी आणि मुलामध्ये देखील वैयक्तिक चर्चा होते. मुलीने आपल्या प्रश्नांमध्ये या एका प्रश्नाचा देखील समावेश करावा. आपण त्यांना, शेवटच्या वेळी तुम्ही कधी रडले होते? हा प्रश्न विचारावा.'
'हे' उत्तर मिळाल्यावरच लग्न करा
डॉ. विकास दिव्यकीर्ती यांच्या मते, 'जर त्याने 'मी जास्त रडत नाही, लहानपणी शेवटी रडलो होतो', असे उत्तर दिले, तर मग तो कोणत्याही उच्च पदावर काम करत असला तरी, त्याच्याशी लग्न करू नका. कारण जी व्यक्ती गेली अनेक वर्षे रडली नाही ती व्यक्ती तुम्हाला खूप रडवेल, यात शंका नाही. कारण न रडणारे व्यक्ती, आतून दगड झालेले असतात. ते भावनेने विचार करीत नाही.'
काळजी घेणारेच रडू शकतात
जर एखादी व्यक्ती, इमोशनल होत असेल, व रडून व्यक्त होत असेल, तर ही बाब चांगली मानली जाते. कारण त्यांना भावनेची कदर असते. सहज रडणारे व्यक्ती खूप भावनिक असतात. ती व्यक्ती इतरांना कधी दुखवू शकत नाही.
रडल्याने मन हलके होते
जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक होते, तेव्हाच ती रडते. डोळ्यातून अश्रू निघतात. अश्रूंमध्ये ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन नावाचे रसायन आढळते. रडल्यानंतर मूड काही अंशी फ्रेश होते. शारीरिक यासह भावनिक वेदना कमी होतात. यासह मानसिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत बनतात.