इतरांविषयी आपली खूप मतं असतात. आपण म्हणतोही की त्या अमकीला मी चांगली ओळखून, तो तमका ना त्याला मी चांगली ओळखते. आता हा प्रश्न स्वत:ला विचारा की आपण स्वत:ला ओळखता का? तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला माहिती आहे की, तुमची स्वत:विषयी काही भलतीच मतं आहेत. इतर तुम्हाला वेगळं समजतात तुम्ही स्वत:ला वेगळं समजता? बघा विचा करुन. अनेकदा वाटतं की आपण एकदम लयी भारी आहोत. कधी वाटतं आपण एकदम फालतू आहोत. आपली स्वत:विषयीची मतं अशी सतत बदलत असतात का?
आपण स्वत:ला खरंखुरं ओळखतो असं आपण म्हणतो. पण खरं म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत आपण स्वत:ला सुद्धा खरंखुरं आणि संपूर्ण ओळखू शकत नाही, असं म्हणतात. आपण ज्या अवस्थेत असतो त्यावेळी आपल्याला असं वाटत असतं की आता हेच माझं व्यक्तिमत्त्व. आणि हे असंच कायम राहणार. त्यातून त्याक्षणार्पयत आपण जे काही तुटपुंजं स्वत:ला ओळखलेलं असतं, तोच असतो आपला गंड बनतो. त्याच आपल्या स्वत:बद्दलच्या भावना. या भावना कधीकधी उच्च असू शकतात, तर कधीकधी क्षुद्रसुद्धा.
त्यातून काय घोळ होतात हे समजून घ्यायला हवं!
(Image : google)
नक्की होतं काय?
१. प्रत्यक्ष आपण जसे आहोत, त्यापेक्षा खूप भारी, खूप महान वगैरे समजायला लागलो, तर त्याला म्हणतात - अहंगंड (सुपिरीऑरिटी कॉम्प्लेक्स) म्हणतात. म्हणजेच असं की, काही मुला-मुलींना तरूण वयात आपल्या शरीराचा, सौंदर्याचा, व्यक्तिमत्त्वाचा, बुद्धीचा, शक्तीचा, आपले आई-वडील कमवत असलेल्या पैशांचा, त्यांनी कमावून ठेवलेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा - इथपासून ते थेट आपल्या जातीचा, धर्माचा असा कशाचाही अतिशय अभिमान वाटायला लागतो. यातून अहंगड तयार होतो. मी म्हणजे काय ग्रेट असं वाटायला लागतं. आणि जे आत्ता चालू आहे, तेच कायम राहणार आहे, असाही त्यातून त्यांचा समज असतो.
२. काहींना वाटतं आपण दिसायला बरे नाही. आपले पालक श्रीमंत नाही. आपण हुशार नाही. आपण शहरात राहत नाही. आपल्याला इंग्रजी येत नाही. आपण फालतू आहोत. त्यातून त्यांचा न्यूनगंड वाढत जातो. आणि आपल्याला आयुष्यात काहीच जमणार नाही असा ते विचार करतात.
(Image : google)
आता यातून स्वत:ला ओळखायचं कसं?
१. स्वत:च्या गुणांची यादी करा.
२. स्वत:च्या अवगुणांची म्हणजे खरंतर कमतरतांची यादी करा.
३. आपल्याला काय आवडते ते लिहा.
४. काय आवडत नाही ते लिहा.
५. आपलं आपल्याविषयी काय मत आहे ते लिहा.
६. इतरांचं आपल्याविषयी काय मत आहे ते लिहा.
७. स्वत:च्या स्वत:कडून काय अपेक्षा आहे ते लिहा.
८. इतरांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहे ते लिहा.
९. आपण काय बदलू शकू ते लिहून काढा.
१०. आयुष्यात काय बदलायला नको ते लिहून काढा.
बघा तुम्हाला स्वत:ची ओळख नक्की होईल..