वृंदावनचे प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांचे विचार आणि कोणत्याही मानसिक समस्येवर त्यांनी दिलेलं धार्मिक उत्तर नेहमीच लोकांचे मन जिंकून घेते. विराट कोहोली, अनुष्का शर्मा यांसारखे अनेक सेलिब्रिटी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घ्यायला वृंदावनला जातात. अलिकडेच इंस्टाग्रामवर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी पुरूषांच्या अशा ५ चुकांबद्दल सांगितले आहेत ज्यामुळे कुटूंब उध्वस्त होऊ शकते. यांचे हे विचार वाचून कुटुंबात शांतता आणि नात्यात गोडवा येण्यास मदत होईल. (Premanand Maharaj Says 5 Mistakes Men Make That Can Ruin a Good Relationship)
पत्नीला भार समजणं
प्रेमानंद महाराज सांगतात की अशी व्यक्ती कधीच आनंदीत राहत नाही जी आपल्या अर्धांगिनीला ओझं समजते. या एका विचारामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी निराश राहू शकते. कुटुंबातील इतर व्यक्तींप्रमाणे पत्नीचाही आदर करायला हवा.
मुलगा-मुलगीत भेदभाव करणं
जी व्यक्ती मुलीच्या जन्मानंतर दुखी होते आणि पत्नीला मुलगा न झाल्याबद्दल त्रास देते ती व्यक्ती नेहमी त्रासलेली असते. मुलगा, मुलगीमध्ये भेदभाव केल्यामुळे परमात्मा नाराज होतात आणि त्या घरात नेहमी अशांतता राहते.
पत्नीचा आदर न करणं
अशी व्यक्ती नेहमी दु:खाने त्रासलेली असते ती आपल्या पत्नीचा अपमान करते. पत्नी कशीही असेल तरीही पत्नीचा अपमान होईल असं काहीही बोलणं टाळावं. कारण एकमेकांचा आदर करणं हे नेहमीच महत्वाचे असायला हवं. एकमेकांचा अनादर केल्यानं कुटुंबात आनंद टिकून राहत नाही.
खाण्यापिण्याबात WHO नं दिल्या गाईडलाईन्स; तब्येत चांगली ठेवायची तर काय खायचं, काय टाळायचं- पाहा
पत्नीला पैसे न देणं
जे लोक पत्नीच्या गरजांची काळजी घेत नाहीत ते नेहमीच गरिबीचा सामना करतात. पैसा आणि उद्योगात वाढ होण्यासाठी लक्ष्मी आनंदी असणं फार महत्वाचे असते. नेहमीच पत्नीला काहीना काही रक्कम स्व खर्चासाठी द्यायला हवी.
बाथरूमच्या पाइपमधून गांडूळ-गोम येते? १ ट्रिक - घरात कधीच गांडूळ दिसणार नाहीत
पत्नीला मारहाण करणं
अनेक माणसं बाहेरचा राग घरात काढतात. घरात अपशब्द वापरणं, शिव्या देणं, मारहाण करणं यामुळे वातावरण बिघडतं. जे पुरूष शांत राहत नाही त्यांच्या आयुष्यात काही ना काही समस्या येतच राहतात. म्हणून कोणत्याही स्थितीत आपल्या पत्नीशी नम्रपणे बोलायला हवं.