सध्या लग्नाचा सिजन सुरू आहे. लग्न वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा- परंपरांनुसार केलं जातं. सगळ्यात आधी मुलगा आणि मुलीची कुंडली जुळते की नाही हे पाहिलं जातं. पत्रिका जुळल्यानंतरच लग्न ठरवलं जातं. लग्नाआधी दोघंही, कमाई किती आहे, संपत्ती, घर, वाहनं, वागणूक या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहतात. पण अशी एक गोष्ट आहे. ज्याकडे आजचं लग्नाआधी फारसं लक्ष दिलं जात नाही ते म्हणजे मेडिकल फिटनेस. लग्नाआधी मेडिकल फिटनेसची चाचणी करणं सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक असतं. (Premarital health checkup these medical tests done before the wedding marriage fertility sperm test)
जर तुम्ही आपल्या पार्टनरबरोबर संपूर्ण आयुष्य चांगलं घालवण्याचा विचार करत असाल तर त्याच्या मेडिकल स्टेटसबाबत माहिती असणंही तितंकंच महत्वाचं आहे. म्हणून या लेखात तुम्हाला ४ फिटनेस टेस्ट सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गंभीर समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
इन्फर्टिलिटी टेस्ट
पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट आणि महिलांच्या ओव्हरी हेल्थबाबत कल्पना असण्यासाठी इन्फर्टिलीटी चाचणी करणं महत्वाचं आहे. कारण इन्फर्टिलिटीशी संबंधित कोणतीही लक्षणं सुरूवातीला दिसून येत नाहीत. भविष्यात बेबी प्लॅनिंग किंवा नॉर्मल सेक्शुअल लाईफसाठी हे फार महत्वाचं आहे.
ब्लड ग्रुप कंपॅटिबिलिटी टेस्ट
ही खूप महत्वाची टेस्ट आहे. भविष्यात तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करणार असाल तर ही चाचणी करायलाच हवी. दोघांचे ब्लड ग्रुप अनुकूल नसल्यास प्रेग्नंसीच्यावेळी खूप त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
जेनेटिक आजारांसंबधी टेस्ट
लग्नाआधी जेनेटिक टेस्ट करणं गरजेचं आहे. अनुवांशिक आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिडीकडे जात असतात. म्हणून लग्नाआधी पार्टनरनं जेनेटिक आजारांसंबंधी टेस्ट करायला हव्यात. जेनेटिक आजारांमध्ये स्तनांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, किडनी डिसीज, डायबिटीस यांचा समावेश आहे.
सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीस
सध्याच्या काळात लग्नाआधी संबंध ठेवणं खूपच कॉमन झालंय. अशा स्थितीत आपण सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीजची चाचणी करायला हवी. या आजारांमध्ये एचआयव्ही, एड्स, गोनोरिया, हर्प्स, हेपेटाइटीस यांचा समावेश आहे. जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यासाठी एसटीडी टेस्ट नक्की करून पाहायला हव्यात.