Lokmat Sakhi >Relationship > Privacy between Couples Joint Family : एकत्र कुटुंबामुळे ‘प्रायव्हसी’ मिळत नाही? ४ टिप्स, जोडप्यांमधला ताण होईल कमी

Privacy between Couples Joint Family : एकत्र कुटुंबामुळे ‘प्रायव्हसी’ मिळत नाही? ४ टिप्स, जोडप्यांमधला ताण होईल कमी

Privacy between Couples in Joint Family : आपल्या अडचणींविषयी परस्परांशी बोला. शक्यतो मोकळेपणानं जागेची अडचण आहे हे मान्य करा. त्यामुळे कुठं फिरायला जाणं, बाहेरगावी जाणं यातूनही प्रश्न सुटू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 01:16 PM2022-10-29T13:16:03+5:302022-10-29T13:18:05+5:30

Privacy between Couples in Joint Family : आपल्या अडचणींविषयी परस्परांशी बोला. शक्यतो मोकळेपणानं जागेची अडचण आहे हे मान्य करा. त्यामुळे कुठं फिरायला जाणं, बाहेरगावी जाणं यातूनही प्रश्न सुटू शकतात.

Privacy between Couples in Joint Family : 4 Ways To Keep Romance Alive When Living In A Joint Family | Privacy between Couples Joint Family : एकत्र कुटुंबामुळे ‘प्रायव्हसी’ मिळत नाही? ४ टिप्स, जोडप्यांमधला ताण होईल कमी

Privacy between Couples Joint Family : एकत्र कुटुंबामुळे ‘प्रायव्हसी’ मिळत नाही? ४ टिप्स, जोडप्यांमधला ताण होईल कमी

मोठ्या शहरात लहान घरात राहताना अनेक जोडप्यांना सेक्स लाइफसंदर्भात अनेकदा मन मारुन जगावे लागते. हा प्रश्न कुणी कुणाशी बोलत नाही. पण संकोच आणि मन मारुन जगणं मात्र वाट्याला येतंच. त्यातही शहरात. लहानशी घरं. एकत्र कुटूंब. घरात माणसं जास्त. घर इतकं लहान की प्रायव्हसी, एकांत हे शब्द सुद्धा उच्चारु नयेत. (How to improve sex life) अनेकदा नवीन लग्न झालेल्यांसह तरुण जोडप्यांची कुचंबणा होते पण सांगणार कुणाला? त्यातून नात्यातले ताण वाढतात. भांडणं होतात. आणि अगदी मूल होणं, न होणं इतपर्यंत या समस्या जातात. त्यावर उपाय काय? (How do couples get privacy in joint family)  

शहरी जगणं आणि जोडप्यातले ताण असलेले लैंगिक आणि वैवाहिक आयुष्य याविषयी अभ्यास प्रसिध्द होतात तेव्हाही ते नात्यात प्रायव्हसीचं महत्त्व अधोरेखित करतातच. असेच काही प्रश्न वाट्याला आले तर त्यातून वाट काढत आपल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी हे काही मुद्दे.. (What to do for good sexual health)

१. विकएण्डला फिरायला जाणे

गर्दी नसलेल्या ठिकाणी विकएण्डला फिरायला जा आणि पार्टनरला पूर्णवेळ द्या. सुरक्षित पण बजेट हॉटेल पहा. अनेकदा परस्परांना भरपूर वेळ देणं, रोमान्स, सोबत असणं, गप्पा यातूनही ताण कमी होतो.

२.  बेड क्रॅकिंग

पलंगांचा आवाज होणं हे ही लहानशा घरात अत्यंत संकोचाचं कारण ठरू शकतं. अशावेळी पलंग न वापरता जमिनीवर अंथरुण घालणं जास्त सोयीस्कर ठरावं. अर्थात हा अतिशय व्यक्तिगत कम्फर्टचाही मुद्दा असतो.

३. टीव्ही ऑन

ही एक प्रभावी पद्धत आहे. एकत्र कुटुंबात राहणारी, घरं लहान असेल तर आपल्या खोलीत टीव्ही सुरु ठेवणं, गाणी लावणं हा पर्याय आहे. म्हणजे आपलं बोलणं बाहेर ऐकू जात नाही.

४. परस्परांना वेळ

आपल्या अडचणींविषयी परस्परांशी बोला. शक्यतो मोकळेपणानं जागेची अडचण आहे हे मान्य करा. त्यामुळे कुठं फिरायला जाणं, बाहेरगावी जाणं यातूनही प्रश्न सुटू शकतात. मात्र मान्य करायला हवं की लहान जागेत, शहरात जोडप्यांमध्ये प्रायव्हसीचे प्रश्न आहेत. त्यामुळे सेक्सचेही अनेक प्रश्न निर्माण होऊन अनेकांना कुचंबणा सहन करावी लागते.

Web Title: Privacy between Couples in Joint Family : 4 Ways To Keep Romance Alive When Living In A Joint Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.