व्हॅलेंटाईन्स वीक Valentines Week गेल्या काही वर्षांपासून भारतातही जोरदार सेलिब्रेट केला जातो. विशेषत: कॉलेज गोईंग तरुणांमध्ये या डेजचे मोठे फॅड असते. व्हॅलेंटाईन्स डे Valentines Day 2022 बरोबरच महत्त्वाचे असणारे काही दिवस यामध्ये आवर्जून साजरे केले जातात, प्रपोज डे Propose Day हा त्यापैकीच एक. दरवर्षी ८ फेब्रुवारीला प्रपोज डे जगभरात साजरा केला जातो. आपल्या मनातल्या त्या खास व्यक्तीला आपल्याला अनेक दिवसांपासून प्रपोज करायचे असते, पण ते कसे करायचे हे मात्र आपल्याला कळत नाही. मनातल्या भावना व्यक्त तर करायच्यात पण कशापद्धतीने त्या समोरच्यापर्यंत पोहचवाव्यात याबाबत आपण फारच कन्फ्युज असतो. समोरचा आपल्या भावना ऐकल्यावर काय म्हणेल, कसा रिअॅक्ट करेल. आपण त्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे यासारखे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात सतत येत असतात. असेच सगळे प्रश्न तुमच्याही मनात असतील तर आज आम्ही तुम्हाला प्रपोज करण्याच्या काही सोप्या Tips for proposing आणि खास ट्रीक्स सांगणार आहोत. पाहा यातली एखादी तरी ट्रीक नक्की तुमच्या कामी येऊ शकेल, इतकेच नाही तर तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमचा व्हॅलेंटाईन होऊ शकेल.
१. पाळीव प्राण्यामार्फत पोहोचवा संदेश
तुमच्याकडे किंवा समोरच्या व्यक्तीकडे एखादी मांजर किंवा कुत्रा पाळलेला असेल तर तुम्ही या माध्यमातून त्या व्यक्तीला प्रपोज करु शकता. यासाठी तुमच्या लाडक्या प्राण्याच्या कॉलरला एखादा बो बांधा आणि त्यामध्ये तुमचा मेसेज लिहून या प्राण्याला त्या व्यक्तीकडे तो देण्यास सांगा. तुमचा पाळीव कुत्रा किंवा मांजर छान ट्रेन असतील तर त्यांच्यामार्फत तुम्ही एखादा छोटासा बॉक्सही पाठवू शकता, ज्या बॉक्समध्ये तुम्ही मेसेज लिहीलेला कागद असेल. पाळीव प्राणी तुम्हाला या कामामध्ये अतिशय चांगली मदत करु शकेल.
२. वृत्तपत्राच्या माध्यमातून द्या तुमचा मेसेज
तुमची आवडती व्यक्ती नियमितपणे पेपर वाचत असेल तर वृत्तपत्राचा तुम्ही अतिशय चांगला उपयोग करु शकता. वृत्तपत्राचा रोल करुन तो किंवा ती वाचत असलेल्या पेपरच्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. एखाद्या छानशा कागदावर तुमचा मेसेज लिहून किंवा प्रिंट करुन त्या पेपरमध्ये घाला. हा पेपर त्या व्यक्तीला स्वत: द्या किंवा तिच्यापर्यंत तो योग्य पद्धतीने पोहोचेल अशी व्यवस्था करा. प्रपोज करण्याची ही आगळीवेगळी आणि तरीही एकदम सोपी पद्धत तुम्ही नक्की वापरु शकता.
३. पत्र पाठवा
तुम्हाला आवडणारी व्यक्ती हॉस्टेलला किंवा रुम घेऊन एकटी राहात असेल तर पत्र लिहून ते तिच्या किंवा त्याच्या पत्त्यावर पाठवणे सोपे आहे. अशाप्रकारे जुनी पत्र पाठवण्याची पद्धत वापरल्याने समोरच्या व्यक्तीलाही एकदम छान वाटेल. मात्र हे पत्र पाकीटात घालायला विसरु नका. जर ती व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहात असेल आणि अशाप्रकारे घरी पत्र पाठवणे शक्य नसेल तर मित्रमंडळींच्या साह्याने हे पत्र त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल असे पाहा.