Lokmat Sakhi >Relationship > प्यार किया तो डरना क्या.. १९ वर्षांचा तरुण पडला ५६ वर्षीय महिलेच्या प्रेमात, साखरपुडा झाला आणि..

प्यार किया तो डरना क्या.. १९ वर्षांचा तरुण पडला ५६ वर्षीय महिलेच्या प्रेमात, साखरपुडा झाला आणि..

Blind Love Thailand प्रेमाला ना वयाचं बंधन असतं ना समाजाचं, आपल्या प्रेमापोटी या दोघांनीही घेतला ठाम निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 02:46 PM2022-11-02T14:46:40+5:302022-11-02T14:47:46+5:30

Blind Love Thailand प्रेमाला ना वयाचं बंधन असतं ना समाजाचं, आपल्या प्रेमापोटी या दोघांनीही घेतला ठाम निर्णय

Pyaar Kiya To Darna Kya.. A 19 year old boy fell in love with a 56 year old woman | प्यार किया तो डरना क्या.. १९ वर्षांचा तरुण पडला ५६ वर्षीय महिलेच्या प्रेमात, साखरपुडा झाला आणि..

प्यार किया तो डरना क्या.. १९ वर्षांचा तरुण पडला ५६ वर्षीय महिलेच्या प्रेमात, साखरपुडा झाला आणि..

प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात असलेल्या माणसांच्या वाटेत वयाची बंधनं येत नाहीत असं नेहमीच म्हंटलं जातं. हे त्याचंच उदाहरण. थायलंडमधली ही घटना. एका १९ वर्षीय तरुणाने चक्क ५६ वर्षीय महिलेसोबत साखरपूडा केला. त्यांच्या वयात ३७ वर्षे अंतर आहे. आणि त्यातही चर्चा ही की एका तरुणानं इतक्या वयस्कर स्त्रीसोबत साखरपूडा केला. ( वयस्कर पुरुषांशी तरुण मुलींनी लग्न करणं तसं समाजमान्यच म्हणायचं जगभर.)

१९ वर्षांचा हा तरुण, वुथिचाई चैंटराज त्याचं नाव. ५६ वर्षांच्या जनला नामुआंगरक यांच्या शेजारी राहत होता. जनला यांचा घटस्फोट झाला होता. ती आपल्या घरी एकटीच राहत होती. त्यामुळे घरातील इतर कामं करण्यासाठी ती नेहमी वुथिचाईला घरी बोलवायची. घरामध्ये काम करत असतानाच त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की ते काही दिवसानंतर प्रेमात पडले. बाहेर फिरायला जायचे, एकत्र रेस्टोरेंट्समध्ये जेवायला जायचे. त्यांनी पार्कमध्ये अनेकदा एकमेकांचे खुलेआम चुंबन घेतले आहे. ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ असा काहीसा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो. आता त्यांच्या रिलेशनशिपला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आणि आपण लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली.

त्यांच्या रिलेशनशिपविषयी वुथिचाई चैंटराज सांगतो, ‘दोन वर्ष झाले मी जनलाला ओळखत आहे. तिच्या आधीच्या लग्नाला २० वर्ष झाली आहेत. तिला ३ मुले देखील आहेत. ती खूप इमानदार आणि चांगली आहे. मला ती खूप आवडते. मला तिचं पुढील आयुष्य खूप आरामदायक बनवायचं आहे.’

जनला म्हणते, ‘जेव्हा मी माझ्या मुलांना आमच्या रिलेशनशिपसंदर्भात सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु, आता आम्ही जास्त कोणाकडे लक्ष देत नाही. आम्हा दोघांना एकेमेकांसह वेळ घालवायला आवडतो.’’

Web Title: Pyaar Kiya To Darna Kya.. A 19 year old boy fell in love with a 56 year old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.