प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आज ( १४ नोव्हेंबर) रोजी लग्नबंधनात अ़डकणार आहेत. चंदीगडमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडणाऱ्या या विवाह सोहळ्याला मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित असतील. नुकताच या दोघांचा प्रपोज करताना आणि एकमेकांना अंगठी घालतानाचा एक रोमँटीक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पांढऱ्या कपड्यांत हे दोघेही अतिशय देखणे दिसत आहेत. तसेच उपस्थितींनीही पांढरे कपडे घातले होते. त्यांचे लग्न आणि नुकताच समोर आलेला हा व्हिडियो यामुळे दोघांबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. राजकुमार राव आपल्याला परिचित आहेच पण ही चित्रलेखा नेमकी कोण आहे? या दोघांची भेट कधी आणि कुठे झाली याबद्दल जाणून घेऊया...
कोण आहे पत्रलेखा
पत्रलेखा पॉल ही एक अभिनेत्री आहे. तिचा जन्म मेघालयमधील शिलाँग याठिकाणी झाला. तिचे वडील चार्टर्ड अकाऊंटंट असून आई गृहीणी आहे. पत्रलेखाला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तिची आजी कवियित्री होती असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. पत्रलेखा हिने आपले शालेय शिक्षण आसाममधील बोर्डींग स्कूलमधून तर महाविद्यालयीन पदवी शिक्षण बँगलोरमधील बिशप कॉटन गर्ल स्कूलमधून पूर्ण केले. तिने अभिनयाच्या क्षेत्रात न जाता आपल्यासारखे सी.ए. व्हावे अशी ति्च्या वडिलांची इच्छा होती. मात्र तिला याच क्षेत्रात करीयर करायचे होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच पत्रलेखा हिला ब्लॅकबेरी, टाटा डोकोमो आणि अन्य जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इथून सुरू झालेला तिचा प्रवास नंतर बहरला. २०१४ मध्ये पत्रलेखा हिने राजकुमार रावसोबत बॉलिवूडचा पहिला चित्रपट केला. या चित्रपटाचे नाव होते, सिटी लाइटस, या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता होते.
त्यानंतर तिने लव्ह गेम्स, नानू की जानू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय याबरोबरच तिने टीव्ही मालिका आणि वेबसिरीजसाठीही काम केले. सिटीलाईट या चित्रपचाटीत पदार्पणासाठी तिला अॅव़ॉर्डही मिळाला आहे. सिटीलाईटमधील जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. मागील १० वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट कर होते, अखेर या नात्याला आज नाव मिळणार आहे. राजकुमार आणि पत्रलेखा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. आपल्या आयुष्यातील घटना चाहत्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न हे दोघेही करत असतात. आता त्यांच्या लग्नाच्या लूकमधील फोटो आणि व्हिडियो पाहण्यासाठीही चाहते उत्सुक असून काही तासांतच चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण होईल.