रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बहिणीला यावर्षी काय गिफ्ट देऊ अन् भाऊराया आपल्याला यावेळी काय देणार असे विचार घरोघरच्या भावंडांच्या मनात सुरू असतील. कमीत कमी खर्चात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं, हटके आणि अविस्मरणीय भेटवस्तू द्यावी असं तुम्हालाही वाटत असेल. काही गिफ्ट आयडियाज रक्षाबंधनाच्या दिवशी तुमचा आनंद द्विगुणीत करतील. बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी काय देता येईल याची एक कॉमन लिस्ट असते किंवा काही नाही जमलं तर भाऊ सरळं पैश्यांची भेट देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा एखादी भन्नाट भेटवस्तू दिली बहिणाबाई जास्तच खुश होतील.
१) मोबाइल/लॅपटॉप/टॅबलेट्स
रक्षाबंधानाच्या निमित्ताने आपल्या बहिणीला देण्यासाठी गॅझेट्सचा पर्याय देखील निवडू शकता. मोबाईल लॅपटॉप आणि टॅब्लेट तुमच्या बहिणीलाही गिफ्ट केले जाऊ शकतात, ज्यामुळे तुमची बहीण खूप आनंद होईल. सध्या मोबाईल फोन्सवरही ऑफरर्स सुरू आहेत. त्यामुळे कमी खर्चात तुम्ही चांगला स्मार्ट फोन आपल्या बहिणीला गिफ्ट करू शकता.
२) कोलाज फोटो कलेक्शन
भाऊ आणि बहिणीतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्ही तुमच्या बहिणीच्या जुन्या फोटोंची मदत घेऊ शकता. या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणींची काही मजेशीर फोटो गोळा करा आणि त्यांना एका फ्रेममध्ये ठेवून भेट द्या.
३) सनग्लासेस
सनग्लासेससह स्टाईलिंगचा एक विशेष भाग आहे. फॅशनचा भाग असण्याव्यतिरिक्त, डोळ्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी सनग्लासेस आवश्यक आहेत. तुमच्या बहिणीला ही भेट खूप आवडेल. कमीत कमी पैश्यात ऑनलाईन किंवा एखाद्या दुकानातून तुम्ही बहिणीच्या पसंतीचे सनग्लासेस घेऊ शकतात.
४) मास्क
सध्या कोरोनाच्या काळात सर्वात महत्वाची समजली जाणारी गोष्ट म्हणजे मास्क . मुली आजकाल त्यांच्या ड्रेस कलर प्रमाणे मास्क वापरू लागल्या आहेत. त्यामुळे यंदा तुम्ही तुमच्या बहिणीला डिझायनर मास्क भेट देऊ शकता. ते नक्कीच तिला आवडेल. मास्क तुम्हाला कोणत्या दुकानात उपलब्ध होईल. याशिवाय ऑनलाईन खरेदीचा पर्यायही तुम्ही निवडू शकता.
५) मेकअपचं सामान
यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही बहिणीला एखादे ब्युटी प्रॉडक्ट गिफ्ट करू शकता ज्यात लिपस्टिक, लायनर, काजळ हेअर किटचा पर्याय तुम्ही निवडू शकता. याशिवाय मेकअपचं सामान ठेवण्यासाठी तुम्ही एखादा पाऊचही बहिणीला गिफ्ट करू शकता.
६) स्मार्ट वॉच
आजकाल सगळ्यांमध्येच स्मार्ट वॉचचा क्रेझ आहे. स्मार्ट वॉच भाऊ बहिणी कोणीही वापरू शकतं. त्यामुळे आपल्याला आवडत्या ब्रॅण्डचं स्मार्ट वॉच बहिणीला गिफ्ट करणं हा उत्तम पर्याय ठरेल.