Join us  

बॉयफ्रेंडने फ्राईड फूड ऑर्डर केलं म्हणून मी ब्रेकअप केलं होतं, कारण..रकुल प्रीत सिंग म्हणते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2024 1:54 PM

Rakul Preet Singh says she once rejected a potential partner because he ordered a fried dish, reveals she used to ‘talk’ to her food before eating it : तुम्ही एकमेकांसोबत आनंदाने जेवू शकत नसाल, पदार्थ शेअर करत नसाल तर; काय मजा अशा तकलादू नात्यात..

आयुष्यात प्रेम प्रत्येकाला होतं. कुणी दिसण्यावरून तर, कुणी स्वभावाच्या प्रेमात पडतं (Rakul Preet Singh). नात्यात आल्यानंतर काही गोष्टी पटत नसल्यामुळे किंवा पार्टनरच्या काही गोष्टी खटकत असल्यामुळे आपण नातं संपुष्टात आणतो. ब्रेकअप करण्यामागे अनेक वैयक्तिक कारणं असतात (Relationship). पण कुणी फ्राईड फूडमुळे ब्रेकअप केल्याचं आपण ऐकून होतात का?

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने एक्स बॉयफ्रेंडने फ्राईड फूड ऑफर केल्यामुळे ब्रेकअप केलं. तिचं ब्रेकअप करण्यामागचं नेमकं कारण काय होतं? तिने खरंच फ्राईड फूडमुळे ब्रेकअप केलं होतं का?(Rakul Preet Singh says she once rejected a potential partner because he ordered a fried dish, reveals she used to ‘talk’ to her food before eating it).

रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर बऱ्याच नात्यांमध्ये ब्रेकअप होतं. रकुलही एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघे एकत्र रेस्टॉरंटवर डेटला गेले. मात्र, इथे प्रियकराकडून मोठी चूक झाल्याचं रकुल सांगते.  रेस्टॉरंटला गेल्यानंतर प्रियकराने रकुलसाठी फ्राईड फूड ऑर्डर केले होते. हे पाहून रकुल चांगलीच संतापली. आणि तिने त्याच क्षणी ब्रेकअप केलं. तिने हा किस्सा एका मुलाखतीत शेअर केला होता.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

तिने सांगितलं 'मला मूर्ख किंवा दिखाऊ मुलगा नको होता. फ्राईड फूड खाणारा व्यक्तीही मला नको होता. लोकांच्या स्वतःच्या खाण्याच्या आवडीनिवडी असतात. पण त्याने मी खात असलेल्या अन्नाकडे तुच्छतेच्या नजरेने पाहिलं, आणि मलाही फ्राईड फूड खाण्यास सांगितलं. त्याने मला विचारले ' तू हे काय खात आहेस? यात हेल्दी काय आहे? तेव्हा त्याला मी निघा असं म्हणाले. जर आपण आहार आणि जीवनशैली शेअर करत नसाल तर, यात काही अर्थ नाही.'

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

रकुल आणि जॅकीचं लग्न २१ फ्रेब्रुवारी २०२४ रोजी झाले. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं एकमेकांसोबत छान जुळतं. तिने सांगितलं 'आम्हा दोघांना एक प्रोटीन बार खायला आवडतं. ते आम्ही दोघेही शेअर करून खातो. या लहान गोष्टी आनंद देतात.'

टॅग्स :रकुल प्रीत सिंगरिलेशनशिप