Join us  

‘पहिल्यांदा बाळाला कुशीत घेतलं तो क्षण..’- रणबीर कपूर सांगतो बाबा झाल्यानंतर तो कसा बदलला याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 5:49 PM

Ranbir Kapoor Share His Experience of labor Room with Alia Bhatt : आलियासोबत लेबर रुममध्ये थांबण्यापासून बाळाचा ढेकर काढण्यापर्यंत बाबा म्हणून मी सोबत असतोच, सांगतोय रणबीर कपूर

मूल होणं ही जोडप्यासाठी अत्यंत आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची, नव्या दडपणाचीही भावना असते.  अगदी सेलिब्रिटी पालक असले तरी. आलिया भट-रणबीर कपूर हे दोघे स्टार असले तरी त्यांच्याही वाट्याला हे सारं आलंच. आपलं बाळ आल्याचा आनंद दुसरीकडे जबाबदारीची जाणीव, आयुष्यात होणाऱ्या बदलांचा ताण अशा अनेक गोष्टी एकाचवेळी भसकन सुरु होणारी ही जगण्याची फेज. मनाची कितीही तयारी असली तरी नव्या आईबाबांना बाळ सांभाळणं, रात्रीची जागरणं, आपलं काही चुकत तर नाही ना याची भीती असतेच. त्यातही नव्या आईवर स्तनपानासह अनेक जबाबदाऱ्या नव्यानं येतात (Ranbir Kapoor Share His Experience of labor Room with Alia Bhatt)..

(Image : Google)

अजूनही आपल्याकडे नवा बाबा बालसंगोपनापासून काहीसा लांब असतो. मात्र नवे बाबा आता आपल्या बाळासोबत अगदी पहिल्या क्षणापासून राहण्याचा, त्याची पूर्ण जबाबदारीही घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आपण बाळ झाल्यावर काही काळ पॅटर्निटी लिव्ह घेणार हे रणबीर कपूरने आधीच जाहीर केले होते. आणि आता राहा झाल्यावरही तो आपल्या बाबा होण्यच्या अनुभवाविषयी बोलतो आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रणबीर सांगतो. नुकताच रणबीरने एका मुलाखतीत बाबा होतानाच्या काळातली एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला आलियासोबत मी ही लेबर रुममध्ये होतो. तसेच ८ दिवस दवाखान्यातही तिच्यासोबत होतो. बाळ झाल्यावर आलियाने पहिल्यांदा लेकीला जवळ घेतलं तो क्षण खऱ्या अर्थाने ‘मॅजिकल क्षण’ होता.

(Image : Google)

रणबीरने ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या कार्यक्रमात करीना कपूरला मुलाखत देताना आपल्या वडील म्हणून झालेल्या नवीन प्रमोशनबाबत काही गोष्टी सांगितल्या. आपण एक आठवडा पूर्ण आलियासोबत हॉस्पिटलमध्ये होतो. तसेच आपण डायपर फारसं बदलत नसलो तरी दूध प्याल्यानंतर ढेकर काढणे आणि झोपवणे ही कामे मला परफेक्ट जमतात, मी करतोच असं सांगितलं.   कामानिमित्त बाहेर गेल्यावर आपल्याला राहाची खूप आठवण येते आणि मग मी तिचे फोटो पाहतो असेही तो सांगतो. नवा बाबाही नव्या आईइतकाच बाळासोबत राहण्याचा प्रयत्न करतो ही आनंदाचीच गोष्ट आहे.

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप