विशिष्ट वयानंतर दैनंदिन आयुष्यात लैंगिक गरजाही महत्वाच्या असतात. पण कधी यामुळे आयुष्याला वेगळं वळणही लागू शकतं. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध मॉडेल अमरंथा रॉबिन्सनं द गार्डियनशी बोलताना आपल्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे. अमरंथानं ३ वर्ष शरीरसंबंध का ठेवले नाहीत. यादरम्यान तिच्यासोबत काय काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.
अमरंथानं सांगितले की, ''२०१६ मध्ये जेव्हा मी ३० वर्षांची गोते तेव्हा माझी डेटींग लाईफ खूप खराब सुरू होती. माझ्या आयुष्याचा एक पॅटर्न सेट झाला होता. मी ज्या पुरूषांना भेटायचे त्याच्यांबद्दल मला आकर्षण वाटायचे आणि आमच्यात सेक्यूअल इंटिमसी व्हायची. त्यानंतर लगेचच आमचं रिलेशनशिप तुटायचं. मला असं वाटायला लागलेलं की, पुरूष फक्त शारीरिक गरजांसाठी माझ्याजवळ येतात आणि गरज पूर्ण झाल्यानंतर सोडून जातात.
मग मी विचार केला की, आयुष्यातून सेक्सला हटवून पाहिलं तर..., फक्त लैंगिंक गरजांचा उद्देश न ठेवता माझ्यासोबत कोणी राहत असेल तर ती व्यक्ती खरंच माझ्यासाठी खास असेल. म्हणून मी फिजिकली कनेक्ट होणं पूर्णपणे बंद केलं याचवेळी मी चर्चमध्येही जायला लागले. तिथून मला विश्वास आणि मनोबल मिळालं. ''
अमरंथा पुढे म्हणाली की, ''कोणाशीही लैगिंग जवळीक न वाढवता २ वर्ष खूप चांगले गेले. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण राहिला नव्हता. मी खूप खूश राहू लागले. चर्चच्या सिद्धांतांनुसार वागू लागले. हळूहळू मी भावनिकदृष्ट्या बळकट झाले. पण नंतर मला जाणवलं की मी कोणत्याही कामात माझे १०० टक्के देत नाहीये. उर्जा कमी आहे. तिसऱ्या वर्षी मला माझं आयुष्य बोअर वाटू लागलं.
माझ्या आयुष्यात करण्यासारखं काही राहिलेलंचं नाही असं वाटलं. हे फक्त सेक्स पुरता मर्यादित नव्हतं. तर लहान सहान गोष्टीत फ्लर्टिंग करणं, एखाद्या व्यक्तीला खास समजणं हे मी मिस करत होते. जणूकाही मी जगणंच विसरले आहे. माझं शरीर सेक्शूएलिटीपासून हळूहळू दूर जात होतं. चर्चमध्ये जाण्याचीही इच्छा होत नव्हती.''
पुढे ती म्हणाली की, ''मी स्वत:ला एक संधी देण्याचा विचार केला आणि आयलँडच्या एका पुरूषाला ऑनलाईन भेटली नंतर तिथे ट्रिपला जाण्याचा प्लॅन केला. हा प्लॅन करतान माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. मी विचार करत होती जर मी ही ट्रिप जगले नाही तर आयुष्याचा आनंद कसा घेऊ शकेन? मग मी ठरवलं माझं शरीर आणि आत्म्याचा आवाज ऐकणार आणि तसंच वागणार. माझी डेटींग लाईफ बोअरिंग होती पण मी अनुभव घ्यायला तयार होते.
आयलँडवर मी सगळं केलं जे काही मला करायचं होतं. आता मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की, माझं आयुष्य इतकं चांगलं असतानाही शरीरसंबंधांमुळे मानसिक त्रास व्हायचा. मला आता वाटतंय की माझं सेक्स लाईफ आणि रिलेशनशिप यांचा काहीही संबंध नाही. मला आपलं शरीर आणि सेक्युएसलिटीशी जोडून राहायला आवडतं.''
गैरसमजातून स्वत: ठरवलेल्या गोष्टी अनेकदा आपल्याला नुकसान पोहोचवतात. हे या सगळ्यातून अमरंथा शिकली. म्हणूनच तीनं यापुढे कोणत्याही गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवणार नाही असं ठरवलं. दरम्यान काही वर्ष शरीरसंबंधांपासून दूर राहिल्यानं मला आयुष्यात काय हवंय, मी कोण आहे याची उत्तरं नव्यानं मिळाली असं ती म्हणते.