आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाच्याच मनात शरीरसंबंधांबाबत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. एका ३५ वर्षीय भारतीय मूळ असलेल्या अमेरिकन महिलेनं ठरवलं की वय कितीही वाढलं तरी तिची मुल्य आणि अटींच्या आधारावर रिलेशन पुढे सुरू ठेवणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार फ्रेंण्डस विथ बेनिफिट्स आणि नो स्ट्रिंग्स अटॅच रिलेशनशिप माझ्यासाठी नाही. मी एका लाईफ पार्टनरच्या शोधात आहे.
त्यांनी सांगितलं की, ''मी भारताच्या पारंपरीक मुल्यांना धरून चालणार आहे. भारतात सेक्सचा खूप टॅबू आहे. जेव्हा मी वयात येत होते तेव्हा माझ्या आई वडीलांनी सेक्सबाबत कधीच खुलेपणानं चर्चा केली नाही. मला आणि माझ्या बहिणीला १९९० पासून बॉलिवूडचे चित्रपट पाहायला आवडायचं. मी रटगर्स युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं.कॉलेच्या दिवसात माझ्या घरून मला बॉयफ्रेंडसाठीही परवानगी नव्हती. आम्ही तुझ्यासाठी मुलगा बघू किंवा मॅट्रिमोनियल साईट्सवरचं एखादं स्थळ पाहू असं ते म्हणायचे, यावर मी नेहमीच नकार दिला. त्यांनी माझ्यासाठी भारतीय मूळ असलेला अमेरिकन मुलगा पाहायचं ठरवलं. कारण माझ्या वडीलांचा कधीच माझ्या निवडीवर विश्वास नव्हता.
मी ६ वर्ष वॉल स्ट्रिटमध्ये काम केलं. मुलं माझ्याकडे आकर्षित व्हायची. मला फक्त अंथरूणापर्यंत नेण्याची त्यांची इच्छा असायची. ते फक्त सेक्ससाठी माझा वापर करू इच्छित होते. त्यावेळी मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटायचं. मी जेव्हा २६ वर्षांची होती त्यावेळी मी पहिल्यांदा किस केलं. तो क्षण माझ्यासाठी अद्भूत होता. पण आम्ही त्यापुढे गेलो नाही. मी चार वर्षांपूर्वी एका व्यक्तीला पहिल्यांदा भेटले जो मला खूप आवडत होता. आम्ही रात्री बसून एका हॉटेलच्या रूममध्ये ड्रिंक करत होतो.
त्यावेळी मी त्याला सांगितलं की हा माझा सेक्सचा पहिला अनुभव असेल त्यावर तो म्हणाला तुला अशी व्यक्ती हवी की जी तुझ्यासोबत नेहमीच राहू शकेल. पण मी तुझ्या सोबत कायम राहू शकत नाही. त्यानंतर त्यानं माझ्या मेसेजेसचा रिप्लाय देणं बंद केलं. त्यानंतर मला कळलं की मी अशा व्यक्तीसोबत राहू शकत नाही जो सेक्सनंतर मला सोडून जाईल. मी माझ्या आयुष्यात ज्या नऊ लोकांना डेट केलं त्यातील एकही खास नव्हता. २०१७ मध्ये मी लॉस एंजेलिसला शिफ्ट झाले. मी इक्विनॉक्स जिमध्ये फ्रंट डेस्क मॅनेजरचं काम केलं.
माझे राहणीमान आणि चेहरा पाहून खूप लोकांनी मला प्रपोज केलं पण ज्यावेळी मी त्यांना माझी मुल्य आणि अटी सांगितल्या त्यावेळी ते मला सोडून गेले. तीन मुलांनी तर मला त्यांना अमेरिकेचा व्हिजा हवा होता म्हणून प्रपोज केलं होतं. वाईट वाटायचं मी खूप रडायचे. पण जानेवारीपासून आता मी स्टॅण्डअप कॉमेडी करते. मी स्वत:वरही हसते कारण मी वर्जिन आहे. मी कायम भारतीय मुल्यांना जपत राहणार असून लग्नाआधी सेक्स करणार नसल्याचं मनाशी पक्क ठरवलंय''