Lokmat Sakhi >Relationship > जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..

3 Signs For Healthy Relationship: प्रेम नवं नवं असताना जोडीदाराबाबतच्या काही नकारात्मक गोष्टी दिसत असूनही लक्षात येत नाहीत. पण पुढे जाऊन त्याच गोष्टींचा त्रास होऊ लागतो... तुमचंही तसंच होत नाहीये ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 01:10 PM2023-09-13T13:10:03+5:302023-09-13T13:10:47+5:30

3 Signs For Healthy Relationship: प्रेम नवं नवं असताना जोडीदाराबाबतच्या काही नकारात्मक गोष्टी दिसत असूनही लक्षात येत नाहीत. पण पुढे जाऊन त्याच गोष्टींचा त्रास होऊ लागतो... तुमचंही तसंच होत नाहीये ना?

Relationship Tips: 3 Tips to know your partner is taking you for granted... | जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..

Highlightsजोडीदार आपल्याला गृहित धरत असेल, तर ते वेळीच लक्षात घ्या. कारण भविष्यात जोडीदाराचं असं गृहित धरणं डोईजड होऊ शकतं...

नव्याने प्रेमात पडल्यावर जोडीदाराचं सगळं सगळं काही आवडायला लागतं. आपल्याला मिळालेला जोडीदार परफेक्ट  वाटायला लागतो. सुरुवातीला डोळ्यांवर प्रेमाची धुंदी पण अशी असते की त्याखाली जोडीदाराच्या अनेक  लहान- मोठ्या  नकारात्मक गोष्टीही दिसत नाहीत. किंवा दिसत असून, समजत असून आपण त्याच्याकडे डोळेझाक करतो. पण प्रेमाचे नऊ दिवस जसे जसे सरतात, तसं तसं मात्र जोडीदाराच्या वागण्यातलं, स्वभावातलं बरंच काही खटकू लागतं. ज्या गोष्टींकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, तसं केलं नसतं तर किती बरं झालं असतं, असं वाटू लागतं. म्हणूनच जोडीदार आपल्याला गृहित धरत असेल, तर ते वेळीच लक्षात घ्या. कारण भविष्यात जोडीदाराचं असं गृहित धरणं डोईजड होऊ शकतं...(3 Tips to know your partner is taking you for granted...)

 

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसं ओळखाल
१. इमोशनल करत असेल तर....

जोडीदार कायम त्याच्याच गोष्टी तुम्हाला ऐकवत असेल, तुमच्याकडून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे.

सतत अर्ध डोकं ठणकतं, मायग्रेनचा त्रास? ६ आयुर्वेदिक उपाय, डॉक्टर सांगतात..

कारण अशा व्यक्तींना कायम त्यांच्यावरच फोकस हवा असतो. तो ढळला तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. त्यांच्या दु:खाला ते कुरवाळत बसतात आणि दुसऱ्यांनीही तेच करावं, अशी त्यांची कायमच अपेक्षा असते. 

 

२. स्वत:ची चूक मान्य करत नसेल तर...
चुका सगळ्यांकडूनच होतात. पण ती चूक मान्य करण्याची क्षमता सगळ्यांमध्ये नसते.

तळणीचे मोदक करताना तेलात फुटू नयेत म्हणून ३ टिप्स, मोदक होतील खमंग

त्यामुळे तुमचा जोडीदार जर वारंवार चुकत असेल आणि चूक करूनही त्याला त्याची जाणीव नसेल, त्याबद्दल सॉरी म्हणावं असं वाटत नसेल, तर पुढे जाऊन जोडीदाराची ही सवय त्रासदायक ठरू शकते.

 

३. निर्णय घेताना मत विचारतो का...
ही बाब खूप महत्त्वाची आहे. आणि अगदी लहान लहान गोष्टीतूनही तुम्ही हे ओळखू शकता.

वेटलॉससाठी अत्यंत उपयोगी ४ हेल्थ ड्रिंक्स, पचन होईल झ्टपट आणि वजन उतरेल सरसर....

साधं हॉटेलमध्ये गेल्यावर चहा घ्यायचा की कॉफी किंवा कोणत्या हॉटेेलमध्ये जायचं, कुठे जायचं... हे जर तुम्ही मिळून मिसळून ठरवत असाल तर मात्र तुमच्या जोडीदारासाठी तुमचं मतंही महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं. 

 

Web Title: Relationship Tips: 3 Tips to know your partner is taking you for granted...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.