Join us  

Relationship Tips : 'या' ५ सवयी असलेल्या पुरूषांना लग्नासाठी नकार देतात सर्वाधिक महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 4:06 PM

Relationship Tips : आपल्या पार्टनरची निवड करताना मुली लूक्स, आर्थिक स्थिती, स्वभाव, कुटुंबातील सदस्य संख्या, राहण्याचं ठिकाण अशा अनेक गोष्टी विचारात घेतात.

सुंदर मुली किंवा मुलांकडे सगळेचजण आकर्षित होतात. पण दिसण्याव्यतिरिक्त तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव, सवयी, लहान-सहान गोष्टींवर रिएक्ट करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी तुमचे व्यक्तीमत्व समजण्यास मदत करतात. रिलेशशिपबद्दल बोलायचं झालं  तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत.

आपल्या पार्टनरची निवड करताना मुली लूक्स, आर्थिक स्थिती, स्वभाव, कुटुंबातील सदस्य संख्या, राहण्याचं ठिकाण अशा अनेक गोष्टी विचारात घेतात. त्यांना मुलांच्या काही सवयी आवडतात तर काही सवयींचा तिरस्कार करतात. (Relationship Tips) म्हणूनच तुम्हाला मुलांच्या अशा काही सवयी सांगणार  आहोत ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत. (Boys who have these 5 habits girls do not like such people)

खोटं बोलणं

खोटं बोलणाऱ्या मुलांचा मुलींना खरंच तिरस्कार असतो.  आयुष्यात अशी मुलं त्यांना अजिबात सहन होत नाही, जे वारंवार खोटे बोलतात. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवताना मुली १०० वेळा विचार करतात अनेकदा भांडणं होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हालाही ही सवय असेल तर लगेच बदला.

स्वत:चे कौतुक करणं

जी मुले नेहमी शब्दात स्वतःची स्तुती करतात, मोठ्याने बोलतात. अशा मुलांना मुली  अजिबात  योग्य समजत नाही. असे लोक प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने समजून घेतात आणि त्यांची विचारसरणी इतरांवर लादायची असतात. मुलींना असे लोक आवडतात जे इतरांचे देखील ऐकताता आणि त्याप्रमाणे निर्णय घेतात.

स्वत:चं खरं करणारे

बरेच लोक स्वतःला परिपूर्ण समजतात. अशा स्थितीत ते नेहमी इतरांसमोर ज्ञान वाटत  असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत स्वतःचं म्हणणं खर करायला आवडते. हुकूम गाजवणारी मुलं मुलींची पहिली पसंती नसतात.

व्यसनं 

तुम्हाला दारू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांचे व्यसन असेल तर मुलींना तुम्ही आवडाल हे विसरून जा. मुली अशा मुलांचा खरंच तिरस्कार करतात. व्यसनाधीनता केवळ तुमचे आयुष्यच खराब करत नाही तर मुलींशी संभाषण करण्याची संधी देखील संपवते. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही मुलीच्या जवळ यायचे असेल तर या सवयी लगेच बदला.

ओव्हर पजेसिव्ह

मुलींना स्वातंत्र्यपणे जागायला आवडते. कोणत्याही मुलीला संशयास्पद किंवा ओव्हर पजेसिव्ह मुलासोबत राहणे आवडत नाही. प्रत्येक मुलींला तिचे आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगायला आवडते.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप