वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांमध्ये लैगिंक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. मोठ्या संख्येनं लोक हे ताण तणावाखाली आहेत. डेटिंग अॅप्स, गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्त वापर, तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे दिवसेंदिवस नवीन समस्या जोडप्यांमध्ये उद्भवत आहेत.
मोबाईल फोन सारख्या वायरलेस उपकरणांमध्ये लोक जास्त व्यस्त होतायेत. आजकाल काहीजण कामात इतके व्यस्त असतात की ते लोक शरीरसंबंधांना फारसं महत्व देत नाहीत. पण पार्टनरशी संबंध अनुकूल असणं फार महत्वाचं असतं. कामाचा वाढता ताणं, मोबाईल अॅडिक्टेट असणं अशा लहान सहान गोष्टी तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम करू शकतात.
१) जास्त ताण घेणं
लैगिंक इच्छा कमी होण्याचं तणाव हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. प्रमोशन, प्रोजेक्ट डेडलाइन, वेतन वाढ या सगळ्याबाबत विचार करत असताना ताण तणाव वाढल्यानं कामेच्छा कमी होते. याचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. ताणामुळे शरीरावर अनेकरित्या दुष्परिणाम होऊन कार्यक्षमता कमी होऊ शकते.
आर्थिकदृष्या कमकुवत असणं किंवा वेळेचा अभाव हे ताण तणावाला कारणीभूत ठरणारे महत्वाचे घटक आहेत. ज्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते. दैनंदिन ताण जसे की वेळेवर न खाणे, जोडीदाराशी भांडणं होणं यामुळेही लैगिंक जीवनातील रस कमी होतो.
२) रात्री उशीरापर्यंत काम करणं
सध्याच्या पिढीचे खुले विचार आणि कामाबाबत लवचिकता वैयक्तिक जीवनावरही परिणाम करते. पाश्चिमात्य जगातील लोकांचे कामाचे तास जास्त असतात. आकडेवारी दर्शवते की अमेरिकेत पूर्णवेळ कामगार दर आठवड्याला सरासरी 47 तास काम करतो. परिणामी थकवा, ताण अतिप्रमाणात आल्यानं कामेच्छा कमी होते.
३) डिजिटल साधनांचा वाापर
जर तुम्ही रात्री उशिरा ईमेल पाठवत असाल किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करत असाल तर ते तुमच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो आणि तुमची लैंगिक इच्छा कमी करू शकते. डिजिटल साधनांचा वापर मेंदूला पूर्ण विश्रांती मिळू देत नाही.
नोकरी नसण्यापेक्षा अनिश्चित वातावरणात काम करणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वाईट असू शकते. काम जास्त असणं, नोकरी कधीही जाऊ शकते याची भीती, आर्थिक बाबी याचा लैंगिक जीवनावरही परिणाम होतो. सतत व्यस्त राहिल्याने तुमची ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे लैगिंक जीवनातील रस कमी होतो.
फास्ट लेनमधील जीवनामुळे लोकांमध्ये थकवा, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. दुपारचं जेवण कधी कधी वेळेवर होत नाही कधी टाळलं जातं, काहीजण १२ तासांपेक्षा जास्त काम करतात. व्यस्त दिनचर्येत लैंगिक जीवनाला प्राध्यान्य दिलं जात नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या व्यस्त जीवनात लैंगिक जीवन चांगलं ठेवण्यासाठी संबंध प्रमाणही वाढवलं पाहिजे. संशोधनानुसार, हे सिद्ध झाले आहे की सकाळी सेक्स करणे एक उत्तम स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते आणि यामुळे तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो. कारण सकाळी सेक्स करताना डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स शरीरात तयार होतात जे ताण कमी करण्यास मदत करतात. जेव्हा दिवसभर मूड चांगला असतो, तेव्हा साहजिकच तुमच्या कामातील उत्पादकताही वाढते.