प्रत्येकाच्याच करियरमध्ये चढ-उतार येत असतात. त्यावेळी तुमचं किंवा तुमच्या जोडीदाराचं करियर व्यवस्थित सुरू नसेल तर ताण तणाव येत असेल तर नकळतपणे याचा परिणाम नातेसंबंधांवर होतो. अनेकांच्या नोकऱ्या कोरोनामुळे गेल्या आहेत. आजकाल मार्केटमध्येही अशीच स्थिती आहे. दीर्घकाळ बेरोजगार राहिल्यानं फ्रस्टेशन वाढतं आणि एकमेकांना ब्लेम करायला सुरूवात होते. तुमच्या नात्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी जेणेकरून कोणतीही बिकट परिस्थिती उद्भवली तरी तुमच्या नात्यावर त्याचा परिणाम होणार नाही.
डोकं शांत ठेवा
पार्टनरच्या आयुष्यात सुरू असलेल्या ऊथला पालथीमुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. जबाबदारी एका वरच असेल तर खर्च सांभाळणं कठीण होऊ शकतं. अशा स्थितीत नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं. आरोप प्रत्यारोप करू नये. त्यापेक्षा बोलून प्रश्न सोडवा.
याविषयी इतरांना सांगू नका
तुमच्या खासगी आयुष्यात जे काही घडतंय ते इतरांना सांगू नका. याबाबत मित्र परिवार किंवा कुटुंबातील नातेवाईकांना सांगू नका. कारण नोकरी गेल्याची गोष्टा बाहेर गेल्यानंतर पार्टनरला जास्त वाईट वाटू शकतं. त्यामुळे शरम वाटणं, न्यूनगंड येणं अशा समस्या जाणवू शकतात. त्यापेक्षा ही गोष्ट दोघांपूरतीच ठेवली तर यातून लवकर बाहेर पडण्यास मदत मिळू शकते.
नोकरी शोधायला मदत करणं
जोडीदारास हे समजवून घ्या की तो नोकरी शोधण्याच्या धडपडीत एकटा नाही, आपण देखील त्याच्याबरोबर आहात. आपल्या बाजूने जितके शक्य असेल तितके पात्रता आणि फील्डनुसार नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. एक रिझ्यूमे तयार करण्यात किंवा जॉब पोर्टलवर अपलोड करण्यात मदत करा, अर्थात जर त्याने मदत मागितली असेल तरच. त्याला काही काळ कौशल्य वाढविण्यासाठी एखादा अभ्यासक्रम किंवा अभ्यास करायचा असेल तर त्याला पाठिंबा द्या.
पैश्यांचा हिशोब ठेवा
तुमच्या दोघांची कमाई आता अर्ध्यावर आली आहे. मग तुम्ही बसून किती पैसे शिल्लक उरतील याचा हिशोब ठेवणं महत्वाचं आहे. अशा संकटाच्या वेळी, आपण गरज नसताना खर्च कमी करण्याचा विचार करू शकता. वेळ बदलल्यानंतर पुन्हा तुमच्याकडे चांगले पैसै येतील. सध्या मुलभूत खर्चांबाबत विचार करा आणि निश्चिंत राहा.
एकाचवेळी अनेक काम करण्याची सवय ठेवा
एक माणूस एकावेळी एकच काम करतो असं पूर्वी असायचं. पण आता एकाच पोस्टवर असताना अनेक काम पाहावी लागतात. त्यामुळे तुम्हाला सगळी कामं यायलाच हवीत. नसल्यास ती कामं शिकून घेण्याची तयारी असावी. माझ्या कडून कसं होईल? मला करता येईल का? असा विचार करू नका. नेहमी पॉजिटिव्ह विचार ठेवा. डिजीटल फ्रेंण्डली व्हा म्हणजेच सोशल मीडियाचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊन वापर करा. नोकरी गेल्यानंतर घरी स्वतःचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा, स्वतःला पुरेपूर वेळ द्या.
सोशल मीडियावर अपडेट राहा
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्वीटर प्रोफाइल तुम्ही नेहमी अपडेट करतंच असाल, पण नोकरी मिळवून देत असलेल्या साईट्सवर तुम्ही आपलं प्रोफाईल अपडेट करायला हवं. त्यामुळे तुम्हाला एखादी संधी उपलब्ध होण्याची शक्यता असते. कारण कोरोनाच्या महामारीमुळे जॉब मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणून तुमचा सिव्ही लिक्डंइन प्रोफाईवर अपडेट करा. जॉब व्यतिरिक्त इतर कंपनीची माहिती घ्या, आपल्या बॉस सोबत नवीन आयडिया शेअर करा, स्वतःचा सिव्ही लेटेस्ट फोरमॅटनुसार तयार करा.