Join us

वयाची तिशी ओलांडली म्हणून लग्न जमवण्याची घाई करताय? तरीही जोडीदार निवडताना ५ चुका नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2025 10:24 IST

Relationship Tips: Marriage Tips: How to choose partner: avoid these 5 mistake while choosing a partner: Relationship planning: Late 30s Marriage Guide: how to choose partner in arranged marriage: how to choose partner for marriage: लग्नाचा विचार करत असाल तर या ५ चुका टाळणे महत्त्वाचे ठरेल.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय मानला जातो. (Marriage Tips) जर आपल्या आयुष्यात योग्य जोडीदार नसेल तर आपलं आणि पार्टनर आयुष्य उद्धवस्त व्हायला क्षणाचा विलंब लागत नाही. लग्न म्हटलं की, फक्त दोन माणसांच नाही तर कुटुंबाचे देखील मिलन असते. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना तो योग्य आणि विचारपूर्वक घ्यायला हवा असं वारंवार सांगितलं जातं.(avoid these 5 mistake while choosing a partner)

वय वाढू लागले घरातील सगळीच मंडळी आपल्या मागे लग्नाचा तगादा लावतात. कामाचा व्याप, शिक्षण आणि काही वाईट अनुभवांमुळे अनेकांना लग्नच करावेसे वाटत नाही. वय ओलांडले तरी काहींना आपलं योग्य जोडीदार मिळतं नाही. वयाच्या ३० व्या वर्षात आपण आयुष्याच्या उत्तरार्धात असतो. (Late 30s Marriage Guide) या वयात आपली करिअर, जीवनशैली आणि विचार करण्याची पद्धत बदलते. (how to choose partner in arranged marriage) त्यामुळे योग्य जीवनसाथी निवडणे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे असते. जर तुम्ही घाईघाईने किंवा चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला तर तुम्हाला नंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जर वयाची तिशी ओलांडली असेल आणि यावेळी लग्नाचा विचार करत असाल तर या ५ चुका टाळणे महत्त्वाचे ठरेल. यामुळे भविष्यात आपलं पार्टनरसोबत कितपत जुळून येईल हे कळेल. तसेच नात्यात दूरावा देखील येणारं नाही. 

Valentine's Day : सतत किरकिर-कटकट-भांडणं, ५ चुकांमुळे नात्यात येतो दुरावा, तुम्ही ‘असं’ तर वागत नाही?

1. वयाच्या दबावामुळे लग्न नको

आता लग्न करणं, म्हातारा होशील... वय वाढले की, घरातले लग्नाच्या मागे लागतात. पण फक्त वयाच्या दबावाखाली लग्न करणे ही सर्वात मोठी चूक असू शकते. लग्नाला कोणत्याही वयाचे बंधन नाही. परंतु, योग्य वयात लग्न होणं देखील तितकंच महत्त्वाचे आहे. लग्न करायचं असेल तर तुमचा आनंद आणि सोयीनुसार करा. कोणत्याही सामाजिक दबावाला बळी पडू नका. 

2. बाह्य गोष्टीवर लक्ष 

जर तुम्ही जोडीदार निवडताना चांगली नोकरी, स्टेटस, लूक किंवा सोशल मीडिया प्रोफाइल पाहून लग्नाचा निर्णय घेत असाल तर भविष्यात तुम्हाला अनेक अडचणी येतील. नातं हे केवळे दिसण्यावर आधारित नसतं तर समजूतदारपणा आणि भावनिक संबंधांवर आधारित असते. यासाठी तुम्ही जोडीदाराचे विचार, वर्तन आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवा. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व समजून घ्या. 

3. संवाद हवा

बरेचदा लग्नापूर्वी आपण असं गृहित धरतो की, लग्नानंतर गोष्टी आपोआप चांगल्या होतील. त्यासाठी नात्यात संवाद साधा. ज्यामुळे आपल्याला भावी जोडीदाराचा स्वभाव, त्याचे बोलणे आणि वागणे कशाप्रकारचे आहे हे समजेल. लग्नापूर्वी तुमचे विचार, अपेक्षा आणि भविष्यातील नियोजन याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा करा. 

4. समानतेकडे दुर्लक्ष नको

प्रेम आणि आकर्षणाच्या आधारावर लग्न करणे पुरेसे नाही. यासाठी तुमच्या जोडीदाराच्या कल्पना, त्यांची जीवनशैली जुळत नसतील तर भविष्यात नात्यात समस्या येऊ शकतात. लग्नाआधी तुमचे विचार आणि जीवनशैली जुळते की, नाही ते पाहा. भावानिक आणि बौद्धिक संबंध देखील महत्त्वाचे असतात. 

5. वाईट सवयींकडे दुर्लक्ष नको

बऱ्याच वेळा लग्नाच्या भीतीमुळे लोक जो़डीदाराच्या काही वाईट सवयींकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की, लग्न झाल्यानंतर गोष्टी सुधारतील. निवडलेल्या जोडीदाराच्या वागण्यात वारंवार त्याच गोष्टी पाहायला मिळत असतील तर त्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहा. गरज पडल्यास लग्नाचा निर्णय पुढे ढकला किंवा त्यावर पुन्हा विचार करा. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप