Lokmat Sakhi >Relationship > Relationship Tips : लग्नानंतरही ‘एक्स’ची खूप आठवण येते? आयुष्याचं वाटोळं होण्यापूर्वी सावध व्हा, कारण..

Relationship Tips : लग्नानंतरही ‘एक्स’ची खूप आठवण येते? आयुष्याचं वाटोळं होण्यापूर्वी सावध व्हा, कारण..

Relationship Tips : लग्नानंतरही एक्सची खूप आठवण येते? लाईफ डिस्टर्ब होण्याआधीच 'हे' करा अन् खूश राहा

By manali.bagul | Published: March 16, 2022 01:17 PM2022-03-16T13:17:07+5:302022-03-16T13:52:04+5:30

Relationship Tips : लग्नानंतरही एक्सची खूप आठवण येते? लाईफ डिस्टर्ब होण्याआधीच 'हे' करा अन् खूश राहा

Relationship Tips : What to do when you miss your ex after marriage | Relationship Tips : लग्नानंतरही ‘एक्स’ची खूप आठवण येते? आयुष्याचं वाटोळं होण्यापूर्वी सावध व्हा, कारण..

Relationship Tips : लग्नानंतरही ‘एक्स’ची खूप आठवण येते? आयुष्याचं वाटोळं होण्यापूर्वी सावध व्हा, कारण..

मनाली बागुल

आपण प्रेमात असतो. पण त्या नात्यात काही गोष्टी नाही जमत, पटत नाही मग ब्रेकअप होते. (Relationship Tips) अनेकदा घरचे लग्नाला पसंती देत नाहीत म्हणूनही ब्रेकअप करुन दुसरीकडे लग्न केले जाते. तर कधी स्वच्छेनेही वेगळे होत नवे जोडीदार निवडले जातात. हे हल्ली तसं नवीन नाही. मात्र गडबड केव्हा सुरु होते जेव्हा नव्या नात्यात न रमता पुन्हा जुन्याच बॉयफ्रेण्डची, प्रियकराची आठवण येऊ लागते. ( हे पुरुषांचेही होते. जुनीच गर्लफ्रेण्ड बरी होती असे वाटते किंवा जुन्या एक्स गर्लफ्रेण्डचे आनंदातले फोटो पाहून ते झुरायला आणि कुढायला लागतात.)  (What to do when you miss your ex after marriage)

हे होणे तसे काही ॲबनॉर्मल नाही, जुन्या नात्याची आणि माणसाची आठवण येणे साहजिकच आहे. मात्र चुकते किंवा प्रकरण बिघडते किंवा जेव्हा त्या जुन्याला फोन करणं, त्याचा प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियात पाठलाग केला जातो. टेक्स्ट केले जातात. जुने फोटो पाठवले जातात. आणि त्याच आठवणीत वर्तमान हातातून सुटतो आणि दोघांची व्यक्तिगत आयुष्य नासायला लागतात. त्यातून मोठे भावनिक पेच तयार होतात. त्यामुळे तपासून पहा की तुमचंही असं होतंय का? एक्स गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्डची फार आठवण येऊन तुम्ही विचित्र वागू लागला आहात का?

ब्रेकअप का झालं?

याची स्वत:ला आठवण करुन द्या. त्या कारणांमुळे कटूता आली ते परत नको असेल तर जवळच्या माणसांशी बोला आणि जुन्या आठवणीत न रमता, आपलं ब्रेकअप झालं आहे हे स्वीकारा. मूव्ह ऑन करा. ते केलं आणि वर्तमानात जगायला सुरुवात केली तर सोपं होईल.

ऐन तारुण्यात स्पर्म काऊंट घटवतात ५ सवयी; पुरूषांना वंध्यत्वाचा धोका

नवीन लोकांना भेटा

जोपर्यंत तुम्ही नवीन लोकांना भेटत नाही, नवीन आठवणी क्रिएट करत नाही तोपर्यंत तुम्हाला जुन्या गोष्टी आठवणं स्वाभाविक आहे. जर तुम्हाला एक्सची आठवण येत असेल तर भूतकाळ विसरून जा आणि तुमच्या वर्तमान जीवनातील लोकांबरोबर चांगला वेळ घालवा. तुमच्या मित्रांना भेटा, नव्या जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जा किंवा कुटुंबासोबत डिनरची योजना करा. आताच्या जोडीदारावर अन्याय न करता, आपलं नवीन आयुष्य आनंदाने स्वीकारा. दोघांची तुलना करू नका.

स्वत:वर लक्ष द्या

एक्सची आठवण तुम्हाला अस्वस्थ, दुःखी करू शकते. अशा स्थितीत, लक्ष विचलित करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वतःवर लक्ष देणं सुरू करा. शॉपिंगला जा, स्वत:ला छान गिफ्ट्स द्या, स्वतःसाठी आवडीचं जेवण बनवा किंवा बाहेर जेवायला जा किंवा तुमचा आवडता चित्रपट पहा. एकटं चित्रपट पाहणं, फिरणं सगळ्याचं जमतं असं नाही. पण एकटं फिरल्यानं खूप इंडिपेडंट फिल येतो. तुम्हाला नक्कीच आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटेल. त्यामुळे स्वत:च्या आनंदासाठी एकदा नक्कीच असा प्रयोग करून पाहा.

....म्हणून लग्नानंतरही सर्वाधिक पुरूष फ्लर्ट करतात; त्याची 5 कारणं

तब्येत सांभाळा..

एकूण काय तर तुम्ही स्वत:वर प्रेम करा. तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल तेव्हढेच खुश राहाल. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल ब्रेकअपनंतर बरेच लोक जीम किंवा योगाला जाऊन स्वत:मध्ये, दिसण्यामध्ये बदल घडवून आणतात त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढत जातो. तुम्हीही आपली पर्सनॅलिटी बदलून कॉन्फिडंटली वावरू शकता. कदाचित तुमचं बदलेलं स्वरूप पाहून तुमच्या एक्सलाही ब्रेकअपच्या निर्णयाबाबत रिग्रेट होऊ शकतं.

आवडता छंद जोपासा

असं होऊ शकतं की तुम्हाला मोकळ्या वेळेत एक्सची आठवण येते. हे टाळण्यासाठी मोकळा वेळ कोणत्याही छंदासाठी द्या. चित्रकला, स्वयंपाक, डान्स गाणे किंवा पुस्तके वाचून तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या जुन्या नात्यावरून सहज हटवू शकता. कदाचित प्रेम, रिलेशन या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीनं स्वत:च्या आवडीनिवडींबद्दल विचार केलेलाच नसतो. सतत कोणाशीतरी बोलण्याची, फिलिंग्स शेअर करण्याची सवय असते. आयुष्यात कधीच एकटं पडायचं नसेल तर एकदा स्वत: आवडीनिवडींवर लक्ष द्यायला हवं. त्यामुळे मूड चांगला राहण्यास मदत होईल.

आपल्या भावना व्यक्त करा

कधी कधी मनात खूप काही सुरू असतं पण शेअर करता येईल असा एकही व्यक्ती आपल्या बरोबर नसतो. अशावेळी स्वत:ची घुसमट करण्यापेक्षा आपण आपल्या भावना कागदावर न घाबरता लिहा. ही पद्धत त्यांच्यासाठी अधिक प्रभावी आहे ज्यांना त्यांच्या भावना एखाद्याशी शेअर करण्यात खूप कसंतरी वाटतं. याशिवाय जुनी, रोमॅन्टीक गाणी ऐकल्यानंतरही तुम्हाला फ्रेश वाटू शकतं. हवं तर तुम्हाला आवडत असलेल्या विषयावरची पुस्तकं वाचा.

आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या मित्रांशी किंवा मैत्रिणींशी अनुभव शेअर करा. तुम्ही ज्या स्थितीतून गेलात त्याही पेक्षा बिकट स्थितीतून ते गेलेले असू शकतात. त्याचे अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला 'आपल्याच बाबतीत असं का होतं', असा फिल येणं बंद होईल आणि झालं गेलं विसरून तुम्ही घडलेल्या गोष्टींना हे खूप कॉमन आहे असं समजून आयुष्यात पुढे जाल.

Web Title: Relationship Tips : What to do when you miss your ex after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.