लग्नानंतर अनेक पुरूष आपल्या आजूबाजूच्या महिलांबरोबर फ्रेंडली म्हणजेच मनमोकळेपणानं बोलण्याचा प्रयत्न करतात काही खास प्रसंगी ते मस्करीसुद्धा करतात. त्यांची फ्लर्ट (Flirt) करण्याची पद्धत खूप फनी वाटत असली तरी अनेकदा त्यामागचा उद्देश वेगळा असतो. (Relationship Tips) ऑफिसमधल्या किंवा आजूबाजूच्या मैत्रिणींसह जास्त जवळीक साधणं, जास्त मस्करी करणं अनेकदा नवरा बायकोच्या नात्यात संशय निर्माण करतं. या लेखात तुम्हाला कोणत्या कारणांमुळे पुरूष फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतात हे सांगणार आहोत. (Why married men do flirting here are 5 strong reasons intimacy thrill extramarital affair teasing)
१) वैवाहिक आयुष्यात इंटिमसीची कमतरता
अनेक वेळा असे घडते की पुरुषांना त्यांच्या लाइफ पार्टनरकडून पाहिजे तसे अटेंशन मिळत नाही, यामागे अनेक कारणे असू शकतात. लग्नानंतर स्त्रिया अनेकदा घर सांभाळण्यात व्यस्त होतात, त्यामुळे पतीकडून त्यांचे फारसे लक्ष जात नाही. त्यामुळे पुरूष इतर मुलींकडे आकर्षीत होतात.
२) आयुष्यात थ्रिल
बरेच पुरुष त्यांच्या आयुष्यात रोमांचक गोष्टी शोधतात, म्हणूनच ते अनेकदा फ्लर्टिंगकडे वळतात, स्वतःला बरं वाटण्यासाठी केलेला हा प्रयत्न नात्यासाठी अनेकदा धोकादायक ठरू शकतो.
३) पत्नीला उगाच त्रास देण्यासाठी
बरेच पुरुष आपल्या पत्नीसमोर इतर स्त्रियांशी फ्लर्ट करतात, असे करताना ते आपल्या पत्नीला चिडवण्याचा किंवा उगाच सतवण्याचा प्रयत्न करतात. याच गोष्टीचा राग मनात ठेवल्यानं पत्नी आणि तुमच्यात वाद होऊ शकतात किंवा पत्नी तुमच्यावर सतत संशय घेऊ शकते.
४) एक्स्ट्रामॅरिटल अफेअर
बहुतेक पुरुष फ्लर्ट करतात कारण त्यांना लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवायचे असतात, असे करून ते आपल्या लाईफ पार्टनरची फसवणूक तर करतातच पण अशा प्रकारे त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते. लग्नानंतर फ्लर्टिंग करणे अनैतिक आहे, कारण त्याचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो आणि अनेक बाबतीत नाते तुटते. वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर फक्त पत्नीशी फ्लर्ट करा.
5) स्वत:चं महत्व आणखी वाढवायचं असतं
अनेक पुरूषांना महिलांसमोर प्रेझेंटेबल आणि स्मार्ट दिसायचं असतं. त्यासाठी ते कधीकधी फ्लर्टींग करतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्यामते फ्लर्टिंग केल्यानं लोकांच्या ते चांगलेच लक्षात राहतात आणि त्याचं महत्व वाढतं.