Join us

Relationship Tips : ....'या' कारणांमुळे धोका देणाऱ्या पार्टनरला महिला अनेकदा माफ करतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 13:29 IST

Relationship Tips : आपल्या पतीशी थेट नातं तोडण्यापेक्षा दुसरा चान्स देतात आणि पार्टनर आता पुन्हा असं काही होणार नाही. असा विश्वास ठेवून पुन्हा पॅचअप करतात.

रिलेशनशीपमध्ये जेव्हा कोणताही व्यक्ती धोका देते तेव्हा ते स्विकारणं पार्टनरसाठी खूप कठीण असतं. काही लोक पार्टनरनं फसवणूक केली तर त्याच्याशी संबंध संपवणं पसंत करतात.  तर काहीजणी  आपल्या जोडीदारास क्षमा करण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग निवडतात. अनेकदा लग्न झाल्यानंतर पतीचे बाहेर अफेअर असणं, किंवा पत्नीचं इतर पुरूषांवर प्रेम असणं अशा घटना घडत असतात. आपल्या पतीने  खोट बोलून दगा दिला आहे. याची कल्पना असताना सुद्धा महिला आपल्या पतीला माफ करतात. आज आम्ही तुम्हाला महिला पार्टनरला माफ करण्यास का तयार होतात याबाबत सांगणार आहोत. 

इतक्या वर्षांचे नातं तोडायची इच्छा होत नाही

अनेकदा गैरसमजांमुळे नाती तुटतात.  चूक झाल्यानंतर पती आपल्या पत्नीची चुकीबद्दल माफी मागत असतो. कोणत्याही प्रकारे पार्टनरने सोडून जाऊ नये. यासाठी प्रयत्न करत असतो.  कारण चूक झाल्यानंतर व्यक्तीला  दुसरा चान्स हवा असतो. त्यात  काही गैर नाही. म्हणून महिला आपल्या पतीशी थेट नातं तोडण्यापेक्षा दुसरा चान्स देतात आणि पार्टनर आता पुन्हा असं काही करणार नाही. असा विश्वास ठेवून पुन्हा पॅचअप करतात.

लोक काय म्हणतील

महिलांना नेहमी समाजातील लोक काय म्हणतील याची भीती असते. आपल्या धोकाबाज पतीचे अफेअर लोकांसमोर येऊ नये असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे पती-पत्नीमधील वाद जर चार भिंतींच्या बाहेर गेला तर अब्रु राहणार नाही, लोक वाटेल ते बोलतील असा विचार करून महिला आपल्या पार्टनरला माफ करतात. खूप कमी महिला पार्टनरनं असं काही केल्यानंतर आवाज उठवतात आणि नातं तोडणं पसंत करतात. 

मुलांच्या भवितव्याची काळजी

मुलांची जबाबदारी आई-वडील दोघांवरही असते. अशात पतीकडून धोका मिळाल्यानंतर मुलांना  सांभाळण्याची जबाबादारी एकट्या स्त्रीवर येते.  त्यामुळे पतीशिवाय राहिल्याने मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम घडून येत असतो.  याशिवाय स्त्री जर कमावती नसेल तर मुलांचा आणि स्वतःचा सांभाळ कसा करायचा असाही विचार मनात येतो.  महिला कमावत असेल तरीही भावनिक, मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज असते.  म्हणून आपल्या पतीला महिला चूक असताना सुद्धा माफ करतात.

कायमचं माहेरी राहण्याची भिती

भारतीय समाजात  मुलींना लग्न झाल्यानंतर माहेरचं घर परकं झाल्याप्रमाणे होतं.  ज्या घरात लग्न करून जात असते. तेच तिचं घर असतं. म्हणून पतीशी नाराज होऊन मुलींना जास्त दिवस माहेरी राहायला आवडत नाही. सगळ्याच मुली स्वतःच्या कमाईतून घरं घेऊन एकट राहत स्वतःचे जीवन जगण्यास सक्षम असतातच असं नाही. म्हणून भविष्यातील  समस्यांचा विचार करून महिला पतीला माफ करतात.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप